BuldanaBULDHANAHead linesVidharbha

शरद पाटलांचे साहित्य नोबेलचे मानकरी ठरावे : शिवश्री सुभाषचंद्र सोनार

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – कॉम्रेडच्या मांदियाळीत कॉम्रेड शरद पाटील अनन्य कॉमेडी आहे. इतिहासकार शेकडो झालेत पण शरद पाटील यांच्यासारखा इतिहासकार, साहित्यिक, समीक्षक व विचारवंत होणे नाही. संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांवर प्रभुत्व, जाणीव व सौंदर्यशास्त्राचा प्रचंड अभ्यास, अब्राम्हणी सौंदर्यशास्त्राची निर्मिती करून दिवंगत शरद पाटलांनी बहुजनाचा 5000 वर्षाचा ज्ञानाचा बॅकलॉग भरून काढलाय. शरद पाटील व्यासाग्रामी व्यक्तिमत्व होते. त्यांचे साहित्य जागतिक स्तरावर गेले तर ते नोबेलचे मानकरी ठरू शकते असे प्रतिपादन शिवश्री सुभाष चंद्र सोनार पुणे यांनी केले.

कॉम्रेड शरद पाटील जयंती निमित्त मराठा सेवा संघाच्यावतीने जिजामाता महाविद्यालय बुलढाणा येथे आज सुभाष चंद्र सोनार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे राज्यसहसचिव डॉ मनोहर तुपकर, उद्घाटक म्हणून एडवोकेट जयश्रीताई शेळके, डॉक्टर सुभाषराव कोल्हे, डॉक्टर राजेश्वर उबरांडे पत्रकार गणेश निकम केळवदकर ,सचिन तायडे रवींद्र चेके, संजय खांडवे, प्रमोद टाले, पी जी सवडतकर, प्रा.योगेश्वर निकस, शिवमती ज्योती जाधव, अभियंता काळवाघे, किशोर वाघ, शिवाजी पाटील, प्रा. शाहीना पठाण, सत्येंद्र भुसारी, सुरेश साबळे आदींची उपस्थिती लाभली. पुढे बोलताना सोनार म्हणाले- बहुजन समाज इतरांच्या सौदर्य शास्त्रावर अवलंबून राहतो. मात्र जोपर्यंत आपण आपले सौंदर्यशास्त्र विकसित करणार नाही तोपर्यंत सांस्कृतिक गुलामगिरी जाणार नाही. राजकीय गुलामगिरी दूर केल्या जाते मात्र न समजणारी सांस्कृतिक गुलामगिरी दीर्घकाळ घातक ठरू शकते. शरद पाटलांनी हातभर ग्रंथसंपदा निर्माण करून आपल्यासाठी विचारधन मागे ठेवले आहे. त्यांचे साहित्य विचारवंतांनी वाळीत टाकले. हे साहित्य जगभर गेल्यास ते नोबेलचे मानकरी ठरू शकतात इतके सकस असल्याचे सोनार म्हणाले. उद्घाटनपर भाषणात एडवोकेट जयश्रीताई शेळके यांनी भूमिका मांडली. देशातील अस्वस्थ स्थिती व उपाय यावर त्यांनी भाष्य केले. संचलन राजेंद्र धोंडगे यांनी तर आभार प्रमोद टाले यांनी मानले.

असा कॉम्रेड होणे नाही – डॉक्टर तुपकर
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर मनोहर तुपकर यांनी शरद पाटील यांच्या ग्रंथसंपदेची माहिती दिली. शरद पाटील यांचे साहित्य वाचले तर आपणास दिसते की त्यांनी बहुजनासाठी आवश्यक ते सर्वच पैलु हाताळले आहे. सौंदर्यशास्त्रावर त्यांची मांडणी अनन्यसाधारण आहे. असे सांगून डॉक्टर तुपकर यांनी त्यांच्या ग्रंथ संपदेचा परिचय दिला. यावेळी बुलढाणासह इतर तालुक्यातून मराठा सेवा संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमस्थळी विक्रमी ग्रंथविक्री
मोठ्या प्रमाणात ग्रंथविक्री झाली. कार्यक्रम संपल्यावर पुस्तके खरेदीसाठी गर्दी झाली. कार्यक्रमासाठी राजेंद्र धोंडगे पांडुरंग सवडतकर, गजानन पडोळ ,अमर पाटील, अनिता कापरे ,अभय पाटील, अनिल पाटील,प्रा. सुबोध चिंचोले,अनिल रिंढे आदी सह बौद्धिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


विचार संपवण्यासाठी अवतार!

एखाद्याचे विचार संपवायचे असतील तर त्याला बदनाम करा आणि बदनाम करता येत नसेल तर त्याला अवतार करा अशी पद्धत आहे. त्याचा उदो उदो करा तो आमचा, आम्ही त्याचे असे केले जाते. सरदार वल्लभभाई पटेल यांनी संघावर बंदी घातली मात्र आज तेच सरदार पटेल यांच्यावर हक्क सांगत आहे. शिवरायांना गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणणे, विवेकानंद यांना हिंदुत्ववादी म्हणणे, बुद्धाला अवतार करणे हे सर्व विचार संपवण्याचे कार्य असल्याचे सोनार म्हणाले. यावेळी त्यांनी दुष्ट नेनीविकरण व सृष्ट नेनीवीकरण, व्यासाग्रामी, वेद,तांत्रिकश्रुती, फाजील उदात्तीकरण यावर प्रकाश टाकला.आजचे व्याख्यांन बुलडाणे करांसाठी वैचारिक मेजवानी ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!