समृद्धी महामार्गावर मृत्यूचे थैमान; भीषण अपघातात १२ ठार, २३ गंभीर जखमी
– वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोलनाक्यासमोरी दुर्घटना, मृतक नाशिक येथील रहिवासी
– गंभीर जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू, राज्य सरकारकडून 5 लाखाच्या आर्थिक मदतीची घोषणा
वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर (गणेश गोडसे) – समृद्धी महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनला असून, या महामार्गावर कालरात्री पुन्हा एकदा मृत्यूने थैमान घातले. सैलानीबाबांचे दर्शन घेऊन नाशिककडे परतणार्या भाविकांची टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रक या दोन वाहनांत समृद्धी महामार्गावरील जांबरगाव टोलनाक्यासमोर आज (दि.१५) पहाटे दीड वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात १२ भाविक ठार झाले असून, २३ भाविक गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व भाविक नाशिक येथील रहिवासी आहेत. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रूग्णालयात (घाटी) वैद्यकीय उपचार सुरू असून, त्यातील सहा जणांची प्रकृती अतिचिंताजनक आहे. मृत्यूंचा आकडा वाढण्याची भीती आहे. अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना त्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. यासह जखमींवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
टेम्पो ट्रॅव्हलरमधील सर्व भाविक हे बुलढाणा जिल्ह्यातील सैलानीबाबांच्या दर्शनासाठी गेले होते. शनिवारी ते पुन्हा नाशिकला परतत होते. वाटेत वैजापूर तालुक्यातील जांबरगावजवळ उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव वेगातील टेम्पो ट्रॅव्हलरने धडक दिली. या घटनेत ट्रॅव्हलरमध्ये बसलेले १२ भाविक जागीच ठार तर २३ भाविक गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना वैजापूर येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय उपचारानंतर तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रूग्णालयात हलवले. या अपघातात सहा वर्षांची चिमुकली बचावली असून, या टेम्पो ट्रॅव्हरलमध्ये एकूण ३५ प्रवासी होते. टेम्पो ट्रॅव्हलर (क्रमांक एमएच २० जीपी २२१२) व ट्रक (क्रमांक एमपी ०९ एमएच ६४८३) या दोन वाहनांत ही भीषण घडक झाली. ही दोन्ही वाहने छत्रपती संभाजीनगर येथून शिर्डीच्या दिशेने जात होती. समोरील ट्रकला ट्रॅव्हलरने पाठीमागून धडक दिल्याने हा दुर्देवी अपघात घडला. सर्व जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, जखमींची प्रकृती स्थिर आहे. अपघाताच्या कारणांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी ब्रेकिंग महाराष्ट्रशी बोलताना दिली आहे. अपघात रात्री १२ ते १ वाजेच्या दरम्यान जांबरगाव टोल नाका येथे घडला. या प्रकरणाची नोंद वैजापूर पोलिस ठाण्यात घेण्यात आली आहे. सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी व इंदिरानगर भागातील रहिवासी आहेत.
नाशिक येथील काही भाविक बुलढाणा जिल्ह्यातील सैलानीबाबा दर्गा येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपल्यानंतर टेम्पो ट्रॅव्हलरने सर्वजण नाशिककडे निघाले असताना नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील वैजापूर जांबरगाव शिवारातील टोलनाक्यापासून काही अंतरावर उभ्या असलेल्या ट्रकवर ही गाडी धडकली. हा अपघात इतका भीषण होता की टेम्पो ट्रॅव्हलरचा पूर्णपणे चक्काचूर होऊन चालकासह १२ जणांचा जागीच मृत्यू झाला. पाच वर्षाच्या मुलीचादेखील यामध्ये समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने बचाव कार्याला सुरूवात केली. वैजापूर पोलिस आणि रुग्णालयाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर पाच ते सहा रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. तपासीणीनंतर १२ जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. जखमी झालेल्या २३ जणांवर उपचार सुरू करण्यात आले आहे. जखमींपैकी १४ जणांना गंभीर मार लागलेला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणतात, ‘छत्रपती संभाजीनगरनजीक एक खाजगी वाहन, ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमींपैकी १४ जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी स्वतः तेथे पोहोचले आहेत. ६ जखमींवर वैजापूर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मृतकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.’
अपघातातील मृतांची नावे :
१. तनुश्री लखन सोळसे (वय ५ ,रा. समता नगर नाशिक)
२. संगीता विलास अस्वले (वय ४०, रा. वणासगाव, निफाड)
३. कांताबाई रमेश जगताप (वय ३८,रा. राजू नगर नाशिक)
४. रतन जमधडे (वय ४५, रा. संत कबीर नगर नाशिक)
५. काजल लखन सोळसे (वय ३२,रा. समता नगर नाशिक)
६. रजनी गौतम तपासे (वय ३२, रा. गवळणी, नाशिक)
७. हौसाबाई आनंदा शिरसाट (वय ७०, रा. उगाव ता. निफाड जि. नाशिक)
८. झुंबर काशिनाथ गांगुर्डे (वय ५०, रा. राजू नगर नाशिक)
९. अशोक झुंबर गांगुर्डे (वय १८रा. राजू नगर नाशिक)
१०. संगीता झुंबर गांगुर्डे (वय ४०,रा. राजू नगर नाशिक)
११. मिलिंद पगारे (वय ५०, रा. कोकणगाव ओझर ता. निफाड जि. नाशिक)
१२. दिलीप प्रभाकर केळाणे (वय ४७, रा. बसवंत पिंपळगाव नाशिक)
जखमींची नावे :
पूजा संदीप अस्वले, वय ३५ वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक.
वैष्णवी संदीप अस्वले, वय १२ वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक.
ज्योती दीपक केकाणे, वय ३५ वर्ष, रा. पिंपळगाव,ता.निफाड, जि. नाशिक
कमलेश दगु म्हस्के, वय ३२ वर्ष, रा. राहुलनगर, नाशिक.
संदीप रघुनाथ अस्वले, वय ३८ वर्ष, रा. तिरुपतीनगर, जेलरोड, नाशिक.
युवराज विलास साबळे, वय १८ वर्ष, रा. इंदिरानगर, नाशिक.
कमलबाई छबु म्हस्के, वय ७७ वर्ष, रा. ममदापूर, नाशिक.
संगीता दगडु म्हस्के, वय ६० वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक.
दगु सुखदेव म्हस्के, वय ५० वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक.
लखन शंकर सोळसे, वय २८ वर्ष, रा. समतानगर, नाशिक.
गिरजेश्वरी संदीप अस्वले, वय १० वर्ष, रा. नाशिक.
शांताबाई नामदेव म्हस्के, वय ४० वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक.
अनील लहानु साबळे, वय ३२ वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक.
तन्मय लक्ष्मण कांबळे, वय ८ वर्ष, रा. पिंपळगाव,ता.निफाड, जि. नाशिक.
सोनाली आप्पासाहेब त्रिभुवन, वय २५ वर्ष, रा. वैजापुर
श्रीहरी दीपक केकाणे, वय १२ वर्ष, रा. पिंपळगाव,ता.निफाड, जि. नाशिक.
सम्राट दीपक केकाणे, वय ६ वर्ष, रा. पिंपळगाव,ता.निफाड, जि. नाशिक.