लोणार (उद्धव आटोळे) – लोणार तालुका व शहरातील गणेश मित्र मंडळ हे विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. अशाच प्रकारे शहरातील श्री बाल वाल्मिकी गणेश मंडळाने दिनांक २६ सप्टेंबररोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये महिला, पुरुष व तरुण मंडळींनी सहभाग घेऊन रक्तदान केले. यामध्ये एकूण ११६ रक्तदात्यांनी रक्तदान करून एक आदर्श प्रस्थापित केला आहे. यापुढेही असेच वेगवेगळे उपक्रम हाती घेण्याचा निर्धार श्री बाल वाल्मिक गणेश मंडळाने जाहीर केला आहे.
या रक्तदान शिबीराला सामाजिक व राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या, तर तरुण मंडळांनी रक्तदान करून समाजकार्य करण्यासाठी प्रोत्साहन दिले. यासाठी नांदेड येथून आलेल्या नांदेड ब्लड बँक यांनी येऊन सहकार्य केले. या कार्यक्रमाला श्री बाल वाल्मिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते व समाजाचे वरिष्ठ समाजसेवक नंदू इंगळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल फलाने, उपाध्यक्ष विनोद इंगळे, सचिव पवन दांडगे, युवा नेते मोहन इंगळे, कोळी महासंघाचे जिल्हा युवा उपाध्यक्ष श्रीकांत मादनकर, कोळी महासंघाचे जिल्हा युवा संघटक मनोज इंगळे, नगरसेवक डॉक्टर प्रवीण नेवरे, वंचित बहुजन आघाडी युवा तालुकाध्यक्ष गौतमभाई गवई, युवा सहसचिव संजय नेवरे, रवि इंगळे, अक्षय इंगळे, विलास दांडगे, राजू दांडगे, संतोष पिसे, देवानंद जाधव, सुमित फोलाने, संतोष फोलाने, राम दिक्षित, प्रमोद दांडगे, मंगेश सरदार, संतोष फोलाने, श्याम इंगळे, योगेश अंभोरे, विश्वास मोरे यांच्यासह असंख्य समाज बांधव व नागरिकांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. आभार प्रदर्शन गोपाल इंगळे यांनी केले.