सिंदखेडराजा (अनिल दराडे) – मानव विकास मिशन योजनेंतर्गत खेड्यापाड्यातील विद्यार्थिनींना आज (दि.२७) राजे संभाजी विद्यालय, असोला जहागीर शाळेत प्रा. सौ. धनश्री शिवराज कायंदे यांच्याहस्ते सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. या सायकलींमुळे गोरगरीब घरातील या मुलींच्या शिक्षणाची वाट सुखकर झाली आहे.
संत भगवानबाबा शिक्षण प्रसारक मंडळ, रूम्हनाद्वारा संचलित राजे संभाजी विद्यालय असोला जहागीर शाळेत मानव विकास योजनेअंतर्गत आज (दि.२७) प्रा.सौ. धनश्री शिवराज कायंदे यांच्याहस्ते २७ मुलींना सायकलीचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण घेण्यासाठी दूरहून वाडी वस्त्यावरून उन्हातान्हात शाळेत यावे लागते, त्यामुळे सहाजिकच शिक्षणाकडे मुलींचे दुर्लक्ष होते. त्यांच्या येण्याजाण्याच्या अडचणी दूर करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी मानव विकास योजनेअंतर्गत सायकल वाटप केले जाते. या कार्यक्रमाच्यावेळी प्रा. सौ.धनश्रीताई मुलींना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्याप्रसंगी शाळचे मुख्याध्यापक श्री कव्हळे सर, शाळा समिती सदस्य गणेश रावजी मांटे, कृष्णा भालेराव, एकनाथ शिंदे, गणेश बुरुकुल, लिंबाजी शिंदे, भगवान भुतेकर, विजय जाधव, गणेश घोंगे, अनिल उगले, श्रावण निकाळजे, लक्ष्मण निकाळजे, समाधान मांटे, दिलीप म्हस्के, रघुनाथ बुरकुल, अनिल चित्तेकर, गौतम चित्तेकर, ज्ञानदेव घोंगे, शिवाजी लोखंडे, वामन घोंगे, चांगदेव शेळके, ज्ञानेश्वर भालेराव, संतोष जायभाये, संतोष शेळके,संजय शेळके, गणेश मांटे, राजेश्वर खरात सर, डी एस कायंदे सर डी एन नागरे सर, कोल्हे सर, पी.जी.कायंदेसर , शिवहरी मांटे, गणेश शेळके, गजानन नागरे आदी मान्यवर उपस्थित होते.
————–