खामगाव/बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून व गणेश विसर्जन मिरवणूक असल्याने वाहतुकीस अड़थळा निर्माण होवू नये, यासाठी खामगाव येथील गुरूवार, २८ सप्टेंबर रोजी भरविण्यात येणारा आठवड़ी बाजार रद्द करण्यात आला आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी ड़ॉ. किरण पाटील यांनी २६ सप्टेंबररोजी जारी केला आहे.
खामगाव शहरातून दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणुक मोठ्या थाटामाटात काढली जाते. सर्व गणेश मंड़ळांची विसर्जन मिरवणूक एकत्र काढली जात असल्याने मोठ्या प्रमाणात गणेशभक्तांची गर्दी असते व उत्साहसुध्दा वेगळाच असतो. तर यामुळे वाहतुकीची कोंड़ीसुध्दा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, २८ सप्टेंबरला खामगावचा आठवड़ी बाजारसुद्धा असतो. त्यामुळे बाजारकरूंचीदेखील गर्दी असते. विशेष म्हणजे, २८ सप्टेंबरलाच गणेश विसर्जन होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण होवू नये व रहदारीत अड़थळा निर्माण होवू नये, यासाठी खामगाव येथील गुरूवार, २८ सप्टेंबरला भरवण्यात येणारा आठवड़ी बाजार रद्द करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी ड़ॉ. किरण पाटील यांनी २६ सप्टेंबर रोजी संबंधितांना जारी केले आहेत.