BULDHANAVidharbha

ज्ञानगंगा अभयारण्यातील देव्हारी गावाचे होणार पुनर्वसन

– गावकर्‍यांचा आनंद झाला द्विगुणित

बुलढाणा (संजय निकाळजे) – बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील तसेच ज्ञानगंगा अभयारण्यात असलेल्या देव्हारी गाव पुनर्वसन करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या गावाच्या पुनर्वसनासाठी मंजूर करण्यात आलेल्या दुसर्‍या टप्यातील ३० कोटी रुपयाचा निधी आ. संजय गायकवाड यांच्या प्रयत्नाने नुकतेच मंजूर करण्यात आल्याने देव्हारी परिसरातील नागरिकात उत्साहचे वातावरण आहे.

बुलढाणा विधानसभा मतदार संघातील देव्हारी या ज्ञानगंगा अभयारण्याच्या कुशीत असलेले हे गाव अभयारण्याच्या बफर झोनमध्ये आहे. या ठिकाणी असलेल्या शेतकर्‍यांच्या शेतीत नेहमीच वन्य प्राण्यांचा शिरकाव होतो, त्यामुळे या वस्तीवर अनेकवेळा हिंस्त्र प्राण्याचा हल्लादेखील झाला आहे. अभयारण्यातील या गावाचा जंगलावर वाढता हस्तक्षेप पाहता सदर गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, यासाठी आमदार संजय गायकवाड सातत्याने शासनाचा पाठपुरावा करीत होते. या पुनर्वसनासाठी शासनाकडे तब्बल ६८ कोटी रुपयांचा प्रस्तावदेखील सादर करण्यात आला होता. त्या अनुशंगाने हक्क व विशेष अधिकार निर्धारित करणे आणि अभयारण्य गावांचे पुनर्वसन या योजनेअंतर्गत सदर प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार शासनाने या योजनेचा दुसरा ३० कोटीचा टप्पा प्रदान केला आहे. यासाठी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड सातत्याने प्रयत्नशील होते. या निधीमुळे आता लवकरच देव्हारी येथील नागरिकांना लाभ देवून गावाचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या गावांत एकूण २९८ कुटुंबांना प्रत्येकी कुटुंब दहा लाख प्रमाणे मोबदला देण्यात येणार आहे. तसेच ४८ लाभार्थ्यांना शेतीसंदर्भात मोबदला, तर २०९ कुटुंबांना घराचा मोबदला देण्यात येणार आहे.


उर्वरित निधी उपलब्ध करुन द्यावा – आ. गायकवाड
देव्हारीच्या पुनर्वसनाचा प्रश्न रखडलेला आहे. शासनाने या प्रकल्पाचा उर्वरित ६ कोटीचा निधी लवकरात लवकर उपलब्ध करुन द्यावा, जेणे करुन गावाच्या पुनर्वसनाच्या विषयाला विकास मिळेल, अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी शासनाकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!