News Update
कापड दुकानच्या गोडाऊनला भीषण आग; १५ लाखाचे कपडे जळून खाक
चिखली शहरातील भव्य कपड्यांचे दालन आहे. या कपड्यांचे दालन असलेल्या दहिगांववाला यांचे गोडावून शहरातीलच शिंदे हॉस्पीटलच्या खाली असून त्याठीकाणी काही दिवसांपूर्वीच येणाऱ्या सणासुदीच्या निमीत्तने मोठया प्रमाणात माल भरुन ठेवण्यात आला होता. त्या गोडावून आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत १५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
चिखली (शहर प्रतिनिधी) – शहरातील शिंदे हॉस्पिटल नजीकच्या खाजगी गोदामाला आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास आकस्मात आग लागली. यामुळे रुग्णालयातील रुग्णांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. यात मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने प्राणहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या बंबांनी मोठ्या शिताफीने या आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेची चौकशी पोलिस करत आहेत.
आज दुपारी शिंदे हॉस्पिटल परिसरातील जालना रोडवर असलेल्या सौरभ जैन यांच्या गोदामाला ही आग लागली. शॉटसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून, हॉस्पिटलला लागून असलेल्या दहिगाव इंडियनच्या गोडाऊनलादेखील आगीने आपल्या कवेत घेतले. गोडावूनमधील कापडाच्या गाठी व प्लास्टिकचे कव्हरमुळे आगीने रौद्ररूप धारण केले. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती. आगीचे वृत्त समजातच ठाणेदार संग्राम पाटील तात्काळ घटनास्थळी पोहचले. यावेळी नागरिकांनी आसपास असलेल्या दवाखान्यातील अग्नीरोधक यंत्र वापरून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मोठ्या प्रयत्नांती आगीवर नियंत्रण मिळवले गेले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाल्याने पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त तैनात केला होता. या आगीत दोन्ही गोदामांचे मोठे नुकसान झाले असून, या आगीची झळ मात्र शिंदे हॉस्पिटलला बसता बसता वाचली. तरीही सुरक्षेचा उपाय म्हणून रूग्णांना हलविण्यात आले होते. अधिक तपास चिखली पोलिस करत आहेत.