BULDHANAVidharbha

कोरोना महामारीपेक्षा रस्ते अपघातात मृतकांची संख्या जास्त : राधेश्याम चांडक

बुलडाणा (संजय निकाळजे) – सार्वजनिक बांधकाम मंडळ, अकोला यांचे अधिनिस्त अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हयातील सार्वजनिक बांधकाम विभागाची रस्ते अपघात व त्यावरील उपाययोजना’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा 5 सप्टेंबररोजी आयोजीत करण्यात आली होती. रस्ते अपघातात दररोज मृत्युकांची संख्या कोरोना महामारीपेक्षा जास्त असल्याचे प्रतिपादन कार्यशाळेचे उद्धघाटक राधेश्याम चांडक (भाईजी) यांनी वरील काढले.

बुलडाणा अर्बनच्या ‘गोवर्धन’ इमारतच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणुन बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक तर अध्यक्ष म्हणून अविनाश धोंडगे, अधिक्षक अभियंता, सा.बा.मंडळ, अकोला हे उपस्थित होते. सुभाष राऊत, कार्यकारी अभियंता बुलडाणा-वाशिम, प्रसाद पाटील, कार्यकारी अभियंता अकोला, थोटांगे, कार्यकारी अभियंता, खामगांव यांची कार्यशाळेला प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना राधेश्याम चांडक यांनी केंद्र शासनाच्या अहवालानुसार भारतात रस्ते अपघातात दररोज जखमी होणारे व मृत्यु पावणाऱ्यांची संख्या कोरोना काळापेक्षाही गंभीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, त्यासाठी अभियंत्यांनी अत्याधुनिक साधनांचा वापर करण्याबाबत संबंधीत कंत्राटदार यांना प्रोत्साहीत करावे. माहीती फलकांचाही वापर करावा, रस्ते चांगल्या दर्जाचे झाल्यावरही अपघाताचे प्रमाण कमी व्हावे त्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) यांनी वाहन चालविण्याचा परवाना देण्याची पध्दत अधिक कडक करावी, ज्यामुळे भविष्यात अपघातांची संख्या कमी होईल, तसेच आपल्या नोकरीच्या कार्यकाळात व सामजीक जीवनात कसे जगावे याबाबत ही मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळेच्या अध्यक्षीय मार्गदर्शनात अविनाश धोंडगे अधिक्षक अभियंता, सा.बा.मंडळ, अकोला यांनी रस्ते अपघात कसे कमी होऊ शकतात याबाबत उपाय सुचविले व त्यांच्याच संकल्पनेतुन सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यांत आले होते. त्यांनी शिक्षकदिना निमित्य सदर कार्यशाळेचे आयोजन करुन सर्व अभियंता यांना एक आगळी वेगळी भेटच दिली. सदर कार्यशाळेत प्रताप भोसले यांनी रस्त्यावरील वाहतुकीनुसार रस्त्याचे व इतर अनुशंगीक बाबींचे नियोजन कसे करावे, रस्त्यावरील वाहतुक कशी सुरक्षीत होईल याचे प्रेझेंटेशन दाखविले. चेतन कनाकीया, नेहा इन्फ्रा, मुंबई यांनी रस्ते बांधकाम व देखभाल करतांना अत्याधुनिक मशीनचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन केले.
यावेळी आशिष महाजन, श्रीमती माधुरी राखा, आर. जे. कन्सल्टंट यांनी रस्ते बांधकामातील सुरक्षीतते बाबत मार्गदर्शन केले. अमित राऊळे, ३एम इंडीया यांनी रस्ते अपघात टाळण्यासाठी आत्याधुनिक बोर्ड बाबत माहीती व प्रेझेंटेशन दिले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसाद पाटील कार्यकारी अभियंता, सा.बा. विभाग अकोला, राजेश राठोड, उपकार्यकारी अभियंता, सा.बा.उप-विभाग अकोला व त्यांचे अधिनिस्त अभियंता यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!