मेहकर (तालुका प्रतिनिधी) – सुजाण नागरिक घडवणे ही जबाबदारी केवळ शिक्षकांचीच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाची आहे. युवकांनी शिक्षण आणि कौशल्याद्वारे स्वतःच्ये करिअर घडवण्यासाठी ध्येय निश्चित करा, आणि उच्चपदावर जाण्यासाठी कठोर परिश्रम घ्या, यश नक्कीच मिळेल. आयुष्यात कोणतेही उद्दिष्ट गाठायचे असेल तर शिक्षण सर्वात महत्त्वाचे आहे. सोबतच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत सामाजिक एकोपा निर्माण व्हावा व सर्वांनी सर्वधर्मसमभावाने, गुण्यागोविंदाने नांदावे, तसेच कोणताही स्वार्थ नसताना घाटबोरीचे सरपंच गजानन चनेवार व पत्रकार संतोष अवसरमोल यांनी फक्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आणि पत्रकारांच्या उल्लेखनीय लेखणीची नोंद घेऊन पत्रकारांचा सन्मान केला व विविध कलाक्षेत्रातील गुणवंतांचा गौरव केला, खरोखरच आपुलकी अन् सेवाभावी वृत्तीने कौतुकास्पद कार्यक्रम आयोजित केला, असे मत अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांनी मेहकर तालुक्यातील घाटबोरी येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. मेहकर तालुका ग्रामीण पत्रकार संघ व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने आयोजित जातीय सलोखा, पत्रकार व पोलीस प्रशासन सुसंवाद व गुणवंतांचा सत्कार सोहळा या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे सहसंपादक अनिल मंजुळकर यांचा सत्यस्पर्शी पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थांनी ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोदबापु देशमुख होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संतोष अवसरमोल व सरपंच गजानन चनेवार यांनी केले, तर जेष्ठ पत्रकार सिद्धेश्वर पवार, पत्रकार जयचंद भाटिया, पत्रकार विष्णू आखरे, पत्रकार कृष्णा हावरे, पत्रकार हमीदभाई मुल्लाजी, मेहकरचे अतिरिक्त तहसीलदार भूषण पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीमती भाग्यश्री जाधव, अप्पर जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते. महामुनी यांनी आपल्या भाषणात जातीय सलोखा, पत्रकार व पोलीस प्रशासन सुसंवाद साधून मार्गदर्शन केले. अप्पर जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी दिनेश गिते म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी जशी जनतेच्या सहकार्याची गरज असते, तसेच लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ असलेले पत्रकार यांच्या सहकार्याचीदेखील गरज पोलीस, प्रशासन यंत्रणेला असते. परस्पर प्रेम व बंधुभाव जोपासला पाहिजे. तसेच आज विविध क्षेत्रात करिअर करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. शिक्षण घेत असतांनाच आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे हे आधी निश्चित करावे, त्यासाठी ध्येय गाठण्यासाठी युवावर्गाने कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे, असे मत उपविभागीय दंडाधिकारी दिनेश गिते यांनी केले. उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी संवाद साधत ज्ञानाचा वापर करून अर्थजनाच्या संधीचा शोध घेतला पाहिजे, विविध कौशल्ये आत्मसात केल्यानेच स्पर्धा परीक्षेत यश मिळते, असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी यशसंपादन करून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणार्या रुपाली दीपक चव्हाण, सुवर्णा दिगंबर इंगळे, गोपाल नारायण चोंडकर यांना शांतीदूत पुरस्कार देऊन मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले. तसेच गावातील दातृत्वाची भावना असलेले बसवलिंगआप्पा डोंगरे, पांडुरंग शिंदे यांच्या समाजसेवेची दखल घेऊन ग्रामभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर पीएचडी प्राप्त झालेली श्रद्धा राजू चोढेंकर, कृषी अधिकारी विकास अंभोरे, यांच्यासह गावातील विविध पदावर कार्यरत असलेल्यांना घाटबोरी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पत्रकार संतोष अवसरमोल यांच्या आई श्रीमती वच्छलाबाई अर्जुन अवसरमोल व कर्तृत्ववान सरपंच गजानन चनेवार यांनी अप्पर पोलिस अधीक्षक महामुनी यांचा बैलजोडी, शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तर पत्रकारिता क्षेत्रातील सिद्धेश्वर पवार, अनिल मंजुळकर, दत्ताभाऊ उमाळे, जयचंद भाटिया, अमर राऊत, श्रीकृष्ण काकडे, नागेश कांगणे, जमील पठाण, हमीदभाई मुल्लाजी, संतोष मालोसे,सै.महेबुबभाई, पुरुषोत्तम लोखंडे, सुनील मोरे, मनिष मांडवगडे, यांना सत्यस्पर्शी पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी पत्रकार विनोद बोरे यांनी आपल्या जनस्वप्नपृर्ती दैनिकांचे व्यासपीठावर विमोचन केले. यावेळी पत्रकारिता क्षेत्रातील रफिक कुरेशी, कैलास राऊत, फिरोजभाई, रविंद्र वाघ, किशोर इंगळे, अंकुश राठोड, अन्सारभाई शेख, सादिक कुरेशी, सतिष मवाळ, विश्वबंर दळवी, गजानन सरकटे, समाधान पदमणे, मेहकर तालुक्यातील सर्वच पत्रकार उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संतोष नवले, विष्णू आखरे, पुरुषोत्तम लोखंडे, अनिल ठोकळ, यांनी मेहनत घेतली.