बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – ‘वन बुलढाणा मिशन’च्यावतीने ४ सप्टेंबर रोजी सप्तऋषी दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्या संकल्पनेतून ही रॅली काढण्यात आली. रॅलीत ४००हूनअधिक दुचाकीस्वारांनी सहभाग नोंदवला. या दुचाकी रॅलीत विकास आणि अध्यात्माचा गजर करण्यात आला.
सकाळी ९ वाजता चिखली तालुक्यातील उदयनगर येथून दुचाकी रॅलीस प्रारंभ झाला. तोरणवाडा, असोला नाईक, धोत्रा नाईक, किन्ही नाईक, वडाळी, मोहणा, पराखेड, पाथर्डी, वरवंड, गोमेधर, उटी मार्गे जानेफळ येथे रॅलीचा समारोप झाला. रॅलीत सहभागी दुचाकीस्वारांमध्ये भरभरुन उत्साह बघायला मिळाला. श्रावण महिन्यातील तिसर्या सोमवारी सप्तऋषीच्या दर्शनाला विशेष महत्व असते. यानुषंगाने वन बुलढाणा मिशनतर्फे दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीदरम्यान गावोगावी संदीपदादा शेळके यांच्यासह सहभागी दुचाकीस्वारांचे स्वागत करण्यात आले. माता, भगिनींनी औक्षण केले. निसर्गरम्य वातावरण आणि डोंगराळ भागात सप्तऋषीचे ठिकाण आहेत. या रॅली दरम्यान सोमवारी पाच ऋषींचे दर्शन घेण्यात आले.