– मराठा समाजावरील हल्ल्याचा तीव्र निषेध, बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
बिबी (ऋषी दंदाले) – जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणार्या मराठा समाजावर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवित, उद्या (दि.३) बिबी बंदचे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे. या बंदबाबतचे रितसर निवेदन आज बिबी पोलिसांना देण्यात आले. याबंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी उपोषणास बसलेल्या जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी उद्या, (दि.३) बिबी गावातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. सर्व गावातील हॉटेल्स दुकाने व इतर छोटे मोठे व्यापारी उद्योग दिवसभरासाठी कडकडीत बंद करण्यात येणार आहे. मराठा समाज हा शांततेच्या मार्गाने करत असलेले आंदोलन हे चिरडून काढण्यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने पुरुष व महिला, लहान मुले यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात असा लाठीहल्ला पोलीस प्रशासनाकडून करण्यात आला. त्याचा निषेध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर याची एक ठिणगी पडलेली आहे. तरी प्रशासनाने मराठा समाजाला योग्य तो न्याय देऊन सकल मराठा समाजाच्या मागे भक्कमपणे उभे राहायला पाहिजे, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली. या बंदबाबत आज सकल मराठा समाजाच्यावतीने बिबी पोलिस ठाण्याचे ठाणेदार सोनकांबळे यांना लेखी स्वरुपात निवेदन देण्यात आले. हे निवेदन देतेप्रसंगी सकल मराठा बांधव संतोषभाऊ बनकर, पवनभाऊ दंदाले, रमेश खंडागळे, अशोक अंबादास नरवाडे, अमोल बनकर, स्वप्निल बनकर, माधव डुकरे, राम जाधव, गजानन बनकर, सागर बनकर, बाळू काकडे, अमोल कठोरे, पवन बनकर, पिनू तनपुरे, लक्ष्मण नरवाडे, संतोष समाधान बनकर, अंगद ढगे, सोनू बनकर तसेच सकल मराठा बांधव उपस्थित होते.
https://breakingmaharashtra.in/jalana_maratha_andolan/