जालन्यात दगडफेक, पोलिसांचा लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्या डागल्या!
– मराठवाड्यात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलने, बीडमध्ये फडणवीसांचा पुतळा जाळला!
जालना (जिल्हा प्रतिनिधी) – मराठा समाजावरील अमानुष लाठीहल्ल्याचा निषेध करण्यासाठी जालन्यातील अंबड चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. परंतु, या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी आंदोलकांवर लाठीहल्ला केला व त्यांना पांगवले. यावेळी पत्रकार व नागरिकांवरही पोलिसांच्या लाठ्या चालल्या. दोन्ही बाजूने धुमश्चक्री उडाल्यानंतर पोलिसांनी हवेत गोळीबार केला, व अश्रुधुराच्या नळकांड्या डागल्या, तर संतप्त आंदोलकांनीही दगडफेक केल्याचे दिसून आले. जमावाने एका ट्रकलाही आग लावली. दरम्यान, जालन्यासह मराठवाड्यात ठीकठिकाणी संतप्त आंदोलने होत असून, जाळपोळ सुरू होती. पोलिस व आंदोलक यांच्यात जोरदार धुमश्चक्री उडाल्याचे दुर्देवी चित्र मराठवाड्यातील अनेक शहरात दिसून आले. बीड जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला असून, माजलगाव येथे बंदला हिंसक वळण लागले तर जालना जिल्ह्यातदेखील आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. बीडच्या मोठेवाडीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. दरम्यान, जालना शहरातही दगडफेकीच्या घटना घडल्या असून, सद्या तणावपूर्ण शांतता आहे.
महाराष्ट्र के जालना की आज की तस्वीरे..#MarathaReservation #MarathaArakshan #Maratha pic.twitter.com/FQacjvjdWp
— Vivek Gupta (@imvivekgupta) September 2, 2023
मराठा समाजावरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ जालना शहरात मराठा समाजाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या दरम्यान पोलिस व आंदोलकांत ताणाताणी झाल्याने आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्न झाला. त्यात काही आंदोलकांनी दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी हवेत गोळीबार करत, अश्रुधुराच्या नळकांड्याचा मारा केला. त्यामुळे संपूर्ण शहरात या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. अंबड चौफुली येथे दुपारी आंदोलकांनी दगडफेक केली. काही गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. रस्त्यावर दगडांचा खच साचलेला दिसत आहे. जाळपोळ झालेल्या गाड्या विझवण्याचे काम अग्निशमन दलाचे कर्मचारी करत आहेत. सध्या जालना शहर आणि परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला असून, तणावपूर्ण शांतता आहे. याप्रसंगी पोलिसांनी पत्रकारांनाही लाठीमार केल्याचे दिसून आले. तसेच, आंदोलनाचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या काही पत्रकारांना काही आंदोलकांनी शिवीगाळ करत, मारहाण केली असल्याची माहितीदेखील समोर आली आहे. या शिवाय, जाळपोळीचे फोटो घेण्यापासून देखील आंदोलकांनी पत्रकारांना रोखले होते. त्यामुळे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.
#महाराष्ट्र : जालना में #मराठा_आरक्षण की मांग को लेकर प्रदर्शन के दौरान पथराव, वाहनों को किया आग के हवाले
पुलिस ने प्रदर्शनकारियों को किया तितर-बितर किया#Maharashtra #maharashtranews #MarathaReservation #Maratha #MarathaArakshan #viralvideo pic.twitter.com/7GKzCiDQeE
— Shailendra Singh (@Shailendra97S) September 2, 2023
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी सकाळी ९.३० वाजेपासून सिडको बसस्थानक चौकात मराठा समाजाकडून रस्ता रोको करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार यांच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. मराठा आंदोलकांवरील लाठी हल्ल्याचा सर्व स्तरातून विविध मार्गाने निषध व्यक्त केला जाता आहे. राज्य सरकार व पोलिस प्रशासनाच्या हुकुमशाही धोरणाविरोधात छत्रपती संभाजीनगरातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
शरद पवार, उदयनराजे भोसले यांनी घेतली आंदोलकांची भेट!
– मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न; कुणीही कायदा हातात घेतला नसताना लाठीमार का? : शरद पवार
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी अंतरवाली सराटी या गावात जाऊन आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी काय-काय घडले याविषयी सविस्तर माहिती उदयनराजेंना दिली. त्यांनी उदयनराजे यांची आपल्याकडे विचारपूस करायला आल्याबद्दल आभार मानले. तसेच उदयनराजे यांनी सांगितले तर आपण आताच उपोषण सोडून घरी जायला तयार आहोत, असे मनोज जरांगे म्हणाले. विशेष म्हणजे, नेमके याचवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार हेदेखील तेथे पोहोचले. पवारांनीही आंदोलकांची विचारपूस करत त्यांना धीर दिला. प्रश्न समजून घेण्यासाठी लोकशाहीत अधिकार असतो. आंदोलनात कोणताही कायदा हातात घेतला नाही. कोणताही दंगा केला नाही. असे असताना पोलीस बळाचा वापर करणे योग्य नाही. त्याची आवश्यकता नव्हती. हे सर्व माहीत असतानाही बळाचा वापर केला गेला. त्यामुळे लोकशाहीच्या मार्गाने शांततेने मागण्यासाठी कार्यक्रम सुरू होता त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे, असे याप्रसंगी शरद म्हणालेत. ‘कालची घटना दुर्देवी आहे. कालची घटना पाहून इथे आलो. ‘रुग्णालयात जाऊन आलो. काही लोकांना छर्रे मारले गेले आहेत. संबंध नसलेल्यांवर लाठीमार करण्यात आला आहे. पोलीस बळाचा वापर योग्य नव्हता. लाठीमार करण्याची गरज नव्हती. हा मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. आंदोलकांनी कायदा हातात घेतला नाही, असेही पवारांनी याप्रसंगी सांगितले.
फुलंब्रीच्या सरपंचाने जाळली नवीकोरी कार; पोलिसांच्या लाठीमारचा केला निषेध!
मराठा आरक्षणासाठी स्वतःची गाडी पेटवली
फुलंब्री येथील पाल फाटा येथे गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी स्वतःची नवी गाडी पेटवून निषेध व्यक्त केला. (व्हिडिओ : सुरज सोनवणे, दै सामना प्रतिनिधी फुलंब्री) #MarathaArakshan #MarathaReservation pic.twitter.com/MfgLTM599Z
— Saamana (@SaamanaOnline) September 2, 2023
मराठा समाजावर झालेल्या लाठीहल्ल्याचे संतप्त पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. या घटनेचा निषेध म्हणून छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्रीमध्ये एका सरपंचाने स्वत:ची कारच पेटवून दिली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सरपंच मंगेश साबळे असे त्यांचे नाव आहे. त्यांनी लाठीहल्लाप्रकरणी राज्य सरकारचा निषेध करत स्वत:ची गाडी पेटवून दिली. मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश साबळे यांनी वर्षभरापूर्वीच ही चारचाकी घेतली होती. मात्र, काल झालेल्या मराठा आंदोकांवरील लाठीहल्ल्याचा निषेध करत करत त्यांनी फुलंब्री येथील पाल फाटा येथे आज आपले वाहन जाळले. यावेळी मंगेश साबळे यांच्यासोबत काही मराठा आंदोलकही होते.
संभाजीराजे छत्रपती आक्रमक; म्हणाले, ''नाव शिवाजी महाराजांचं घ्यायचं आणि राज्य मुगलांसारखं करायचं.''#jalna #मराठा_आरक्षण #MarathaArakshan
#SambhajirajeChhatrapati pic.twitter.com/AgZcFHs4p6
— Valli S Rajan (@vallir51) September 2, 2023
https://breakingmaharashtra.in/jalana_maratha_andolan/