BULDHANALONARVidharbha

पिसाळलेल्या माकडाचा शेतकर्‍यावर हल्ला; शेतकरी भयभीत!

सिंदखेडराजा (सचिन खंडारे) – शेतात काम करणार्‍या शेतकर्‍यावर पिसाळलेल्या माकडाने जबरी हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना शिंदी शिवारात घडली आहे. या जखमी शेतकर्‍यांवर बुलढाणा येथे वैद्यकीय उपचार सुरू आहेत. वनविभागाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पुढे आली असून, माकडांच्या उच्छादाने शेतकरी भयभीत झालेला आहे.

शिंदी शिवारातील शेतामध्ये साखरखेर्डा येथील शेतकरी धोंडू खराडे हे नियमितपणे लागवड केलेल्या कपाशी वाणाचे कराशन करण्याकरता केले असता, व नियमितपणे ठरलेले काम करत होते. शेताच्या बांधावर असलेल्या झाडावरती गेल्या तीन महिन्यापासून वानराचा कळप राहत होता. हा कळप काही केल्या त्या झाडावरून हटेना व धोंडू खराडे हे जेव्हा जेव्हा माकडांना उसकावून लावायचे तेव्हा मात्र त्यातील एक माकड त्यांच्या अंगावर धावून यायचे. हा नित्यक्रम रोजचा असल्यामुळे धोंडू खराडे यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र ३१ ऑगस्टला खराडे नियमितपणे काम करत असताना कळपातील एक माकड शेतामध्ये आले व पिकांची नासाडी करतील या भीतीपोटी धोंडू खराडे यांनी माकडाला हुसकावले असता, नेहमीचेच अंगावर चालू करून येणारे माकडाने धोंडू सरकटे यांच्यावर धावून गेले व त्यांच्या पायाला जबर चावा घेतला व त्यांच्या अंगावरसुद्धा नखे मारले. माकडाने हल्ला केल्यानंतर धोंडू खराटे यांना प्रतिकार करण्यास करिता वेळ मिळाला नाही. माकडाने हल्ला केल्याबरोबरच त्यांचा तोल गेला व ते खाली पडले. माकडाने खाली पडल्यावर त्यांच्या पायाचा चावा घेतला त्यांना नखे मारले. बिदरलेली अवस्थेमध्ये धोंडू खराडे यांनी सर्व हकीकत परिसरातील लोकांना सांगितली, लगेच त्यांनी साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्वप्रथम प्रथम उपचार करण्याकरता गेले असता, येथील डॉक्टरांनी त्यांना बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयामध्ये जाण्याचा सल्ला दिला, तेथे धोंडू खराटे यांच्यावर उपचार सुरू आहे.
ही सर्व हकीकत बुलढाणा येथील वन विभागाच्या कर्मचार्‍यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी दाखल होत पिसाळलेल्या माकडाला बेशुद्ध करत जंगलात सोडून दिले. या घटनेमुळे शेतातील महिला व शेतकरी शेतमजूर चांगलेच भयभीत झाले आहेत. माकडाला उसकावून किती महागात पडू शकते कल्पना प्रथमदर्शी नागरिकांना आली असून, वन्यप्राणी जर शेतकर्‍याच्या पिकाचे नुकसान करत असेल व जर त्यांना उसकावले असते ते माणसावर हल्ला करत असेल तर वन विभागाने अशा वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. शिवाय ‘हल्ला झालेल्या खराडे यांना तातडीने वन विभागाने ५० हजारांची शासकीय मदत द्यावी, अशी मागणी सुद्धा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!