BULDHANAHead linesVidharbha

प्रशांत डिक्करांचे रविकांत तुपकरस्टाईल आंदोलन; अचानक झाले गायब, आत्मदहनाची दिली धमकी!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी अगदी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या स्टाईलने आंदोलन सुरू केले असून, आपल्या आंदोलनात तुपकरांसारखे धक्कातंत्र वापरले आहे. काल ते जळगाव जामोद येथील अन्नत्याग आंदोलनस्थळावरून अचानक गायब झाले. त्यानंतर त्यांनी आज व्हिडिओ व्हायरल करून पुढील ४८ तासांत नुकसानग्रस्तांना मदत द्या, अन्यथा अज्ञात ठिकाणी आत्मदहन करू, असा इशारा दिला आहे. डिक्करांच्या या आंदोलनामुळे जिल्ह्यातील शेतकरी व प्रशासकीय अधिकार्‍यांना तुपकरांच्या आंदोलनाची आठवण झाली आहे. दरम्यान, पोलिस डिक्करांचा शोध घेत असल्याची माहिती हाती आली आहे.

Prashant dikkarगेले चोवीस तास उलटूनही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर अद्याप बेपत्ता आहेत. दरम्यान, डिक्कर यांचा प्रशासन शोध घेत असतानाच त्यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल होऊ लागला आहे. यामध्ये डिक्कर यांनी ४८ तासांत नुकसानग्रस्तांना मदत करा, अन्यथा अज्ञात ठिकाणी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत मिळावी, या मागणीसाठी डिक्कर हे त्यांच्या समर्थकांसह अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत. या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. दरम्यान, आंदोलनस्थळावरुन डिक्कर हे गुरुवारी गायब झाले. त्यामुळे प्रशासनावर त्यांना शोधण्याची वेळ आली. डिक्कर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा व त्यांना शोधून आणण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी मोठ्या प्रमाणात शेतकरी व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी जळगाव जामोद येथे साखळी उपोषण सुरू केले आहे.


प्रशांत डिक्कर हे मागच्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसले होते. दोन दिवसांपूर्वी प्रशासनाने उपोषण मंडपातील विद्युत पुरवठा खंडित केला होता. त्यानंतर ते आता गायब झाल्यामुळे त्यांच्या पत्नी वंदना डिक्कर यांना अश्रू अनावर झाल्या आहेत. “परिसरातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी ते उपोषणाला बसले आहेत. मागच्या १५ वर्षांपासून ते शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत. पण रात्री ४ वाजल्यापासून ते गायब आहेत. त्यामुळे मी आता पोलिस स्टेशनला जात आहे. दोन दिवसांपासून त्यांचा फोन लागलेला नाही. शेवटचा फोन केला होता त्यावेळी त्यांची तब्येत चांगली असल्याचं सांगितलं होतं.” असं म्हणत त्या भावूक झाल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!