उदयनगर, ता. चिखली (प्रतिनिधी) – जयहिंद लोकचळवळ महाराष्ट्र राज्याचे वतीने उदयनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेविकांचा सन्मान करीत त्यांच्याकडून राख्या बांधून घेत रक्षाबंधन साजरा करण्यात आले. समाजाचे आरोग्य सदृढ राहून सशक्त समाज निर्मिती व्हावी यासाठी रात्रंदिवस सेवा देणाऱ्या भगिनींनी कोरोना काळातही स्वतःची व कुटुंबाची परवा न करता सेवाभावी वृत्तीतून आरोग्यसेवा दिली, त्यांची सेवा सन्मानास पात्र आहे असे गौरवोद्गार या प्रसंगी जयहिंद लोक चळवळीचे ओम डहाके यांनी काढत, या भगिनींकडून औक्षण करून घेत राखी बांधली. यावेळी आरोग्य सेविकांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.
जयहिंद लोकचळवळ तरुणांच्या माध्यमातून लोकशाहीचा जागर करीत सुदृढ समाज निर्मितीसह नवउद्योग निर्मिती, कृषी, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रासह शेतकरी,शेतमजूर,महिला,विद्यार्थी तरुणांसाठी काम करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी जयहिंद लोकचळवळचे ओम डहाके,अक्रम खासाब, प्रमोद टेकाळे वसंता बारगळ, शेख गुलाब,नारायण दिवटे,निसारभाई,ओम दांदडे,अनिल राठोड,वसंता पाटील,सलमानभाई,यासीनभाई साहेबखा पठाण,नामदेव आराख, फकिरा चिंचोले, गोविंद डहाके,संकेत बुंदे,ऋषिकेश दिवटे,जाकीरभाई, फैजलभाई,सचिन काकडे,,दिलीप कड,नारायण उफाळे तथा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उदयसिंग राजपूत आरोग्य सेविका श्रीमती नाटेकर, स्वातीताई गव्हाळे, प्रतीक्षा कदम,कल्पनाताई अंभोरे ,कर्मचारी यांचेसह बहुसंख्य गावकरी व जयहिंद चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते,तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्रम खासाब प्रस्ताविक ओम डहाके यांनी तर आभार प्रमोद टेकाळे यांनी मानले.