लोणार (विजय गोलेच्छा) – आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश प्रसाद यांच्यानंतर बुलढाणा जिल्ह्याला पहिल्यांदाच सुनील कडासणे यांच्यासारखे लोकप्रिय व कर्तव्यकठोर पोलिस अधीक्षक लाभले असून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी लोणारकर टीमसह लोणार पोलिसांनी वीरजधारा तीर्थावर प्लॅस्टिकमुक्ती अभियान राबवून अनोख्या पद्धतीने पोलिस अधीक्षकांचा वाढदिवस साजरा केला.
पोलीस अधीक्षक सुनील कडासणे यांच्या जन्मदिनानिमित्त मी लोणारकर टीम व लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार निमेश मेहेत्रे यांनी वीरजधारा तीर्थ ते सीतानान्ही परिसर प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी स्वच्छता अभियान राबविले. तसेच पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपणदेखील करण्यात आले. यावेळी लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार निमेश मेहेत्रे, एपीआय राबडे, पीएसआय घोगरे गोपनीय विभागाचे चव्हाण व इतर पोलीसवृंद तसेच मी लोणारकर’ टीमचे सचिन कापुरे, किशोर आंबेकर, प्रकाश सानप, बाळू सरदार, रोहन सोसे, विलास जाधव, व सदस्य उपस्थित होते.