– १८ ते २२ सप्टेंबरदरम्यान संसदेच्या विशेष अधिवेशनाचे आयोजन
– याच अधिवेशनात विधेयक पारित होण्याची शक्यता!
नवी दिल्ली (आवेश तिवारी) – ‘एक देश एक निवडणूक’ घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने वेगवान पाऊले उचलणे सुरू केली असून, या संदर्भात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनविण्यात आली आहे. ही समिती यासंदर्भात चोहूबाजूने विचार करून आपला अहवाल सरकारला देणार आहे. याच अहवालावरून या विधेयकाचा मसुदा तयार होणे निश्चित होईल. यासंदर्भातील अधिसूचना लवकरच जारी होण्याची शक्यता आहे. मोदी सरकारने ‘एक देश एक निवडणूक’ हे विधेयक तातडीने पारित करण्याचे ‘रवले असून, यासाठी १८ ते २२ सप्टेंबरदरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले असल्याची माहितीही राजकीय सूत्राने दिली आहे. केंद्राने कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली बनवलेली कमिटी या विधेयकाच्या कायदेशीर बाबींवर तसेच यासंदर्भात सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रियांवरही विचार करणार आहे.
दरम्यान, मोदी सरकारच्या या निर्णयावरून राजकीय नेते टिकाही करत असल्याचे व स्वागतही करत असल्याचे दिसून येत आहे. मोदी सरकारला असे विधेयक आणण्याची गरज आताच का भासली, असा सवाल काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी उपस्थित केला आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी ‘एक देश एक निवडणुकी’ची घोषणा केली होती. आगामी लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असतानाच मोदी सरकारने यासंदर्भात वेगवान पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ते २२ सप्टेंबररोजी विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून, हे १७ व्या लोकसभेचे १३ वे आणि राज्यसभेचे २६१ वे अधिवेशन राहील. या अधिवेशनात पाच बै’का होतील. या अधिवेशनाचा अद्याप एजेंडा निश्चित झालेला नाही, असेही जोशी यांनी सांगितले.
#WATCH | Delhi: BJP national president JP Nadda meets former President Ram Nath Kovind, who will head a committee for 'One Nation, One Election'. https://t.co/lCrAKUbCxn pic.twitter.com/pMuEGKvICR
— ANI (@ANI) September 1, 2023
– या अधिवेशनात हे विधेयक येण्याची शक्यता –
१. ‘एक देश एक निवडणूक’ विधेयक
२. महिलांसाठी संसदेत एक तृतीयांश आरक्षण देणे
३. नव्या संसद भवनात कामकाजाचे स्थलांतर
४. ‘समान नागरी कायदा’ विधेयक सादर होऊ शकते
५. आरक्षणासंदर्भात विधेयक येऊ शकतात
———