चिखली (कैलास आंधळे) – नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात कबुतरे चोरल्याच्या संशयावरून हरेगाव येथील तीन बौध्द मुलांना झाडाला लटकावून अमानुष मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा रिपाइं (आठवले) पक्षाच्यावतीने तीव्र निषेध करण्यात येऊन चिखलीचे तहसीलदार सुरेश कव्हळे यांच्यामार्फत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. या जातीयवादी गुंडांना कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात महाराष्ट्राला हादरून टाकणारी ही घटना घडली आहे. दलित समाजातील तीन मुलांना अमानुष मारहाण करण्यात आली. तसेच, एकाच्या अंगावर लघुशंका केली, त्याला थुंकी चाटायला लावली, कपडे काढून झाडाला उलटे लटकावून बेदम मारहाण केली, वरून बाहेर कोणाला सांगू नका अन्यथा जीवे मारू, अशी धमकी हरेगावतील जातीयवादी गुंड गोलांडे व त्याचे साथीदार यांनी पीडितांसह त्यांच्या परिवाराला दिली. मानवतेला काळिमा फासणार्या या घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चिखली या पक्षाच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला. पुरोगामी महाराष्ट्राला व मानवतेला कलंकीत करणार्या अश्या या नराधमांना कठोरातील कठोर शासन करण्यात यावे आणि हरेगाव येथील पीडितांना कायमस्वरूपी पोलीस स्वंरक्षण देऊन त्यांचे जीवन जगण्याचा अधिकार कोणालाही हिरवल्या जाणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी व पीडितांना तात्काळ न्याय द्यावा, असे न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्यावतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात यईल, असा इशारा रिपाइं तालुका अध्यक्ष हिंमतराव जाधव व शहर अध्यक्ष राजेश बोर्ड यांनी चिखली तालुक्याच्या वतीने शासनास निवेदन देऊन दिला आहे.
हे निवेदन देतेवेळी तालुका उपाध्यक्ष आम्रपाल वाघमारे, तालुका युवक उपाध्यक्ष मयूर मोरे, तालुका युवक सचिव आकाशभाऊ जाधव, तालुका युवक सहसचिव आकाशभाई गवई, शहर उपाध्यक्ष मिलिंद लव्हाळे, शहर सचिव संघप्रिय पवार, शहर सहसचिव प्रसेंजितभाई जाधव, शहर कार्याध्यक्ष नितीनभाई कांबळे, विद्याताई इंगळे महिला आघाडी, आशाताई कस्तुरे महिला आघाडी, अमर वानखेडे, गौतम वानखेडे, निंबाजी घेवंदे, अमोल भंडारे, नितीन घेवंदे, गजानन नाटेकर, दीपक साळवे, विशाल गवई, सतीश दांडगे, मिलिंद विणकर, दयानंद सावळे, उत्तम मेहुणकर, अंकुश देशमुख यांच्यासह इत्यादी पदधिकारी हजर होते.