उदयनगर (झिया काझी) – नेहमीच सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणार्या उपेक्षित घटकांचा विकास व्हावा, सहकाराचे तत्व, जनहिताला महत्त्व, शैक्षणिक सामाजिक आर्थिक क्षेत्रात नवनवीन विक्रम करणार्या बुलढाणा अर्बनच्यावतीने काल, (दि.२५) उदयनगर येथे शाखा कार्यालयात धनादेशाचे वितरण करण्यात आले.
‘बुलढाणा अर्बन’ ठेवीदार तसेच कर्जदार यांचा अपघाती विमा उतरवत असते. त्या अनुषंगाने उदयनगर येथील सभासद रमेश कनीराम राठोड यांचा रोही आडवा आल्यामुळे अपघाती निधन झाले होते. राठोड यांनी शाखा कार्यालयामध्ये तीन लाख रुपयाचा ठेवी ठेवलेल्या होत्या. त्यामुळे संस्थेने तीन लाखांचा विमा निःशुल्क उतरवला होता. ठेवीदार यांच्या वारसाकडून अपघात कागदपत्रांची पूर्तता करून, विमा विभाग मुख्यालय प्रमुख श्री मालू यांच्याकडे पाठपुरावा करून, सदर अपघाती विमा मंजूर करण्यात आला. बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक तसेच चीफ मॅनेजिंग डायरेक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उदयनगरचे सरपंच मनोज लाहुडकार यांच्या हस्ते व उपसरपंच रमेश दांदडे, बुलढाणा विभागाचे विभागीय व्यवस्थापक राजेंद्र वानरे यांच्या उपस्थितीत २५ ऑगस्टरोजी धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी राजेंद्र वानरे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, बुलढाणा अर्बनच्या विविध सेवा सुविधाचा लाभ घ्यावा. या बँकेमुळे ग्रामीण भागातील सर्वांना बँकिंग सुविधांचा लाभ होत आहे.
बुलढाणा अर्बन उदयनगर शाखेचे संचालक अतुल मोहता, पंढरी पाटील, जगदीश राठी, विजय पाटील, किशोर गुंजकर, गजानन चोपडे, रमेश मछले, व प्रतिष्ठित व्यापारी वल्लभ राठी, अंकित कलंत्री, गणेश कचाले, संदीप जवंजाळ, अंकुश शेजवळ, विनोद जाधव, दिवाकर नसवाले आदी उपस्थित होते. यावेळी ठेवीदारांचे वारसदार श्रीमती रेणुका राठोड यांनी बुलढाणा अर्बनचे आभार मानले. सदर कार्यक्रमाची प्रस्तावणा शाखा व्यवस्थापक नंदकिशोर इथापे व आभार ज्ञानेश्वर एकडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी रामेश्वर साबळे, संजय बर्डे, संजय पवार, गजानन साबळे, संतोष कलाल, संदीप चिंचोले, गजानन राठोड, विशाल इंगळे, सुभाष देवकर यांनी परिश्रम घेतले.