चिखली (महेंद्र हिवाळे) – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव तसेच ज्येष्ठ सनदी अधिकारी विद्याधर महाले यांनी चिखली तालुक्यातील अंत्री कोळी-वाघापूर हे गाव विकासासाठी दत्तक घेतले आहे. काल, (दि.२५) त्यांच्याहस्ते अंत्री कोळी येथे रस्त्याचे भूमीपूजन करण्यात आले. याप्रसंगी आमदार श्वेता महाले यांची तब्येत खराब असल्या कारणाने त्या येऊ शकल्या नाहीत.
विद्याधर महाले हे गावात येताच ढोल, ताशे व फटाक्याच्या दणदणाटात त्यांचे स्वागत करण्यात आले. रस्त्याचे भूमिपूजन विद्याधर महाले यांच्याहस्ते पार पडले. याप्रसंगी त्यांनी गावाची पाहणीही केली. गावामधे हनुमान मंदिर येथे आलेल्या मान्यवरांचे स्वागत ग्रामस्थांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचलन सचिन इंगळे यांनी तर, प्रास्ताविक सरपंच सुभाष ठेंग यांनी केले. याप्रसंगी सरपंच सुभाष ठेंग यांनी अंत्री कोळी येथे विविध विकासकामे झालेली आहेत, व होत आहे. परंतु आम्हाला गाव हे अजून विकसित व आदर्श बनवायचे आहे. तर तुम्ही आमचे गाव दत्तक म्हणून घ्या, अशी विनंती केली. तर डॉक्टर राजपूत यांनी चिखलीमध्ये चाललेली विकासकामे सर्वांना सांगितली. यापुढेही आमदार श्वेताताई महाले या आपल्यासाठी कामे करत राहील, याची ग्वाही दिली.
याप्रसंगी विद्याधर महाले यांनी त्यांच्या भाषणातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. देशातील चहा विकणारा माणूस पंतप्रधान होऊ शकतो ते फक्त केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे. पाहिले राजाचा मुलगाच राजा होत असे, आता सर्वसामन्य नागरिक गावाचा, राज्याचा, देशाचा प्रमुख होऊ शकतो, ते फक्त डॉ.बाबासाहेब यांचे उपकार आहे, असे त्यांनी सांगून हे गाव विकासासाठी दत्तक घेत असल्याची घोषणा केली. पुढे ते म्हणाले, येथील उपसरपंच सौ.वर्षा विठ्ठल गिरी यांनी ताई व माझ्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करत गावातील रस्त्याचे, नाल्यांचे, जलजीवन मिशनची व विविध कामे आणण्यासाठी केलेला पाठपुरावा खूप मोठा आहे. त्या मुळे मी आज गावकर्यांच्या शब्दांना मान देऊन मी हे गाव दत्तक घेत आहे. गावाच्या विकासासाठी आमदार निधीतून श्वेता महाले यांनी विविध कामे मंजूर केले आहेत. पाणीपुरवठा योजना, चांगले रस्ते, सांडपाण्याचा मार्ग आदी, रस्त्यावर पुल बंधारे कामे करण्यात येणार असल्याबाबत महाले यांनी सांगितले.
यावेळी विद्याधर महाले यांच्यासोबत भाजपचे नेते डॉ.प्रतापसिंह राजपूत, कृष्णकुमार सपकाळ, शिवाजीराजे देशमुख, अशोक डुकरे, एडवोकेट सदार साहेब, एडवोकेट यांगड साहेब, सुभाषआप्पा मंगरूळकर, अंत्री कोळी सरपंच सुभाष ठेंग, उपसरपंच विठ्ठल गिरी, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील शिंदे, तंटामुक्ती उपाध्यक्ष महेंद्र हिवाळे, अंकुश वाघ, गणेश वाघ, समाधान हिवाळे, योगेश पाटील, समाधान मोरे, अंबादास डुकरे, एकनाथ हरकाळे, अमोल मोरे, शिवराजे मित्रमंडळ व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.