– लोणार येथील ‘संकल्प सभे’ची यशस्वी सांगता!
लोणार (विजय गोलेच्छ) – पृथ्वी ही शेषनागाच्या फण्यावर नसून, श्रमिकाच्या तळहातावर तरली आहे, असे सांगून अंधश्रद्धा दूर करण्याचे काम साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी केले. तेव्हा अण्णाभाऊंसह समाज सुधारकांचे विचार लोकांपर्यंत पोचविण्याचे अथक प्रयत्न करा. बाबासाहेबांची घटना जर टिकवायची असेल तर दिल्ली-मुंबईतील सत्ता खाली खेचा. घटना बदलण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे, तेव्हा सर्वांनी सावध रहा, अशे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार मुकूल वासनिक यांनी केले. येथील श्री मंगल कार्यालय येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या समारोपीय जयंतीनिमित्त आयोजित संकल्प सभेत ते बोलत होते. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विजय अंभोरे यांच्या अध्यक्षतेत दिनांक २५ ऑगस्ट रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमप्रसंगी मंचावर आ. राजेश एकडे, दीपक काटोले, नरेंद्र खेडेकर, श्याम उमाळकर, रेखाताई खेडेकर, अरविंद कोलते, जालिंदर बुधवत, लक्ष्मणराव घुमरे, रशीद खा जमादार, संजय राठोड, ज्ञानेश्वर पाटील, स्वातीताई वाकेकर, कासमभाई गवळी, अनंत वानखेडे, जयश्रीताई शेळके, रामविजय बुरंगले, मनोज कायंदे, मंगलाताई पाटील, नगराध्यक्षा सौ. पुनम पाटोळे, संतोष आंबेकर, आशिष रहाटे, नंदाताई टापरे, विनोद जोगदंड, राजेश मापारी, पराग कांबळे, अनिताताई रनबावरे, शांतीलाल गुगलीया, श्याम राठी आदी उपस्थित होते. पुढे बोलताना खा. मुकूल वासनिक म्हणाले की, ज्यांचा कधी तिरंग्याशी संबंध आला नही, आज ते तिरंगा यात्रा काढण्याचा नारा देत आहेत.तर दिल्ली, मुंबईत बसणारे राज्यघटना बदलू पाहत आहेत. बाबासाहेबांची घटना जर टिकवायची असेल तर दिल्ली मुंबईतील सत्ता खाली खेचा. घटना बदलण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. तेव्हा सर्वांनी सावध रहा, असे खा. वासनिक यांनी यावेळी केले.
यावेळी विजय अंभोरे म्हणाले, की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी साहित्याच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न मांडले, तेव्हा अण्णाभाऊंना साहित्यरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. आपण एकत्र आल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत, तेव्हा समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज आहे. आतापर्यंत समाजाला राजकारणामध्ये खर्याअर्थाने न्याय मिळाला नाही. येणार्या विधानसभा निवडणुकांमध्ये आम्हाला संख्येच्या प्रमाणात जागा मिळाव्यात, अशी मागणी यावेळी अंभोरे यांनी केली. या वेळी काँग्रेसचे सरचिणीस नानाभाऊ गावंडे, आ. राजेश एकडे, नगराध्यक्षा सौ. पूनम ताई पाटोळेबु. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, प्रदेश काँग्रेसचे सचिव दीपक काटोले, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्याम उमाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षा सौ.रेखाताई खेडेकर, पक्ष नेते डॉ.अरविद कोलते, लक्ष्मणराव घुमरे, संजय राठोड, डॉक्टर स्वातीताई वाकेकर, कसमभाई गवळी, अनंत वानखेडे, जयश्रीताई शेळके, मनोज कायंदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शहर व तालुका काँग्रेस कमिटी व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमच्यातर्पेâ खा.मुकूल वासनिक यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
किशोर गारोळे, गौतम गवई, गजानन खरात, शेख समर्थ शेख अहमद शेख राऊत शेख महबूब तौफिक कुरेशी, संतोष मापारी त्याचबरोबर सोशल फोरमचे संतराम तायडे, बी.के खरात, राजेंद्र वानखेडे, लक्ष्मण गवई, भगवान गायकवाड, निवृत्ती तांबे, सोपान पानपाटील, दिगंबर अंभोरे, समाधान साठे, प्रभाकर धोंगडे, किसन बाजड, राजू नाडे, सुरेश मानवतकर, ओम नाटेकर, कृष्णा नाटेकर, मंगलाबाई निकाळजेसह सोशल फोरमचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संतराम तायडे, सूत्रसंचालन राजेंद्र काळे, तर ज्ञानदेव मानवतकर यांनी आभार मानले. यावेळी मधुकर कांबळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.