BULDHANAHead linesVidharbha

जिल्ह्यातील पावणेसहा हजार दलित बांधव लवकरच जाणार हक्काच्या घरात!

– मातंग समाजासाठी बांधली जाणार ७०० घरे!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – अनसूचित जाती व नवबौध्द संवर्गासह मातंग समाजातील प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना आता रमाई आवास योजनेतून हक्काचे घर मिळणार आहे. यामध्ये जिल्ह्यात मातंग समाजासाठी ७१० तर अनुसूचित जाती व नवबौध्द संवर्गासाठी ५ हजार ५५ असे एकूण पाच हजार ७६५ घरांचे उद्दिष्ट मंजूर झाले असून, सदर घरकुलांचे पंचायत समितीनिहाय उद्दिष्ट वाटपदेखील करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती व नवबौध्द संवर्गातील बेघर अथवा कच्चे घर असणार्‍या प्रतीक्षा यादीतील लाभार्थीना शासनाचेवतीने रमाई आवास योजनेतून घरकुलाचा लाभ दिला जातो. यासाठी जवळपास एक लाख चाळीस हजार रूपयाचे अनुदान दिल्या जाते. यासाठी मालकीची जागा असणे अवश्यक आहे. शासनाकड़ून ड़ीआरड़ीएच्या मागणीनुसार जिल्हानिहाय उद्दिष्ट मंजूर केल्या जाते. आयुक्त समाजकल्याण पुणे यांचेकड़ून सन २०२३-२०२४ साठी बुलढाणा जिल्ह्याकरिता मातंग समाजासाठी ७१० व अनुसूचित जाती व नवबौध्द संवर्गासाठी ५,०५५ असे एकूण ५,७६५ रमाई आवास योजनेतून घरकुलांचे उद्दिष्ट मंजूर करण्यात आले असून, पंचायत समितीनिहाय उद्दिष्टाला देखील मंजुरी देण्यात आली आहे.

Housing Schemes in India – Visavaयामध्ये बुलढाणा पंचायत समितीसाठी मातंग समाजासाठी १०० तर अनु.जाती व नवबौध्द संवर्गासाठी ७०० असे एकूण ८००, चिखली पंचायत समिती मातंग समाज ५०, अनु.जाती व नवबौध्दांसाठी ४५० एकूण ५००, देउळगाव राजा पंचायत समिती मातंग समाजासाठी २२, अनु. जाती व नवबौध्दासाठी २२८ एकूण २५०, जळगाव जामोद पंचायत समिती अनु. जाती व नवबौध्दांसाठी १०० एकूण १००, खामगाव पंचायत समिती मातंग समाज १३, अनु.जाती व नवबौध्दांसाठी २८७ एकूण ३००, लोणार पंचायत समिती मातंग समाजासाठी १००, अनु.जाती व नवबौध्दांसाठी ३०० एकूण ४००, मलकापूर पंचायत समिती मातंग समाजासाठी ३०, अनुसूचित जाती नवबौध्द समाजासाठी २७० एकूण ३००, मेहकर पंचायत समिती मातंग समाजासाठी २०० अनु.जाती व नवबौध्दांसाठी ५०० एकूण ७००, नांदुरा पंचायत समिती मातंग समाजासाठी ३५, अनू.जाती व नवबौध्दांसाठी ६६५ एकूण ७००, संग्रामपूर पंचायत समिती मातंग समाजासाठी ६०, अनु.जाती व नवबौध्दांसाठी ५४० एकूण ६००, शेगाव पंचायत समिती अनु.जाती व नवबौध्दांसाठी १५ एकूण १५ तर सिंदखेड़राजा पंचायत समिती मातंग समाजासाठी १०० तसेच अनु.जाती व नवबौध्दांसाठी ९०० एकूण १००० असे घरकुल उद्दिष्ट वाटप करण्यात आले आहे. मोताळा पंचायत समितीला प्रतीक्षा यादी शिल्लक नसल्याने उद्दिष्ट देण्यात आले नसल्याची माहिती आहे.


उद्दिष्टाबाबतचे पत्र जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी संबंधित पंचायत समित्यांना पाठविले असून, संबंधित ग्रामपंचायतींकड़ून लाभार्थीचे प्रस्ताव पंचायत समितीला बोलावून घरकुलाची कामे सुरू करण्यात येतील, असे प्रकल्प संचालक राजेश इंगळे यांनी ब्रेकिंग महाराष्ट्रशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!