– साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे आयोजन
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्ताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सोशल फोरमच्यावतीने लोणार येथील श्री मंगल कार्यालयात उद्या, शुक्रवारी (दि.२५) सकाळी दहा वाजता भव्य संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख मार्गदर्शक व उद्घाटक म्हणून अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव खा. मुकूल वासनिक हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे संस्थापक तथा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय अंभोरे, प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नानाभाऊ गावंड़े तर स्वागताध्यक्ष अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे राज्य अध्यक्ष साहेबराव पाटोळे हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी आ.राजेश एकड़े, आ.धीरज लिंगाड़े, आ. अमित झनक, माजी आ. तथा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, माजी आ. दिलीपकुमार सानंदा, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेड़ेकर, जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ.रेखाताई खेड़ेकर, दादुशेठ, काँग्रेस नेत्या जयश्रीताई शेळके, संजय राठोड, श्याम उमाळकर, रामविजय बुरूंगले, मनोज कायंदे, तेजेंद्रसिह चव्हाण, नंदिनी टारपे, शिवसेनेचे युवानेते आशीष रहाटे, संतोष आंबेकर, नगराध्यक्षा पूनम पाटोळे, निंबाजी पांड़व, किशोर गारोळे, राजेश मापारी, अनंत वानखेडे, शांतीलाल गुगलीया, विनोद बेंड़वाल, देवानंद पवार आदिसह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. तरी या संकल्प मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.