BULDHANAHead linesMEHAKARVidharbha

वरवंडकरांसाठी रविवार ठरला ‘घातवार’; दोन अपघातांत एक ठार, दोघे गंभीर जखमी

– दिवसभरात दोन अपघात, गावावर शोककळा!

मेहकर (अनिल मंजुळकर) – आजचा रविवार वरवंडकरांसाठी घातवार ठरला असून, एकाच दिवशी झालेल्या दोन भीषण अपघातात एकास जीव गमवावा लागला असून, अन्य दोघे गंभीर जखमी झालेले आहे. सकाळी ११ वाजता भरधाव टिप्परने उडविल्याने संतोष रामचंद्र खुरद (वय ३५) हा युवक गंभीर जखमी झाला असतानाच, दुपारच्या सुमारास स्वीफ्ट कार व दुचाकीची धडक झाल्याने ३५ वर्षीय युवक ठार झाला असून, एक युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर मेहकर येथे उपचार सुरू आहेत. या दोन घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, वरवंड गावावर शोककळा पसरली आहे. स्वीफ्ट कार ही सुलतानपूरहून अर्धांगवायूच्या रूग्णाला घेऊन वर्धेकडे निघाली होती. दरम्यान, दुचाकी तिच्यावर धडकल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.

वरवंड येथील युवक संतोष रामचंद्र खुरद (वय ३५) हा सकाळी रस्त्याने शेतात जात असताना, समोरून भरधाव येणार्‍या टिप्परने संतोषला जोरदार धडक देऊन उडविले. हा युवक रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडलेला असतानादेखील टिप्पर चालक तेथून वाहनासह पसार झाला. सद्या संतोषची तब्येत ठीक असून, त्याच्या तोंडाला व डोक्याला मार लागला आहे. या अपघाताच्या घटनेतून सावरत नाही तोच वरवंडवासीयांवर दुसरा आघात झाला. सुलतानपूर येथून वर्धेला जाण्यासाठी निघालेल्या स्वीफ्ट कारवर (क्रमांक एमएच ०२,सीएल ७३८२) वरवंड येथे दुचाकी येऊन धडकली. या अपघातामध्ये अशोक शालीकराम पायघन (वय ३५) या युवकाचा मृत्यू झाला तर राजू रमेश मुके (वय ३०) हा तरूण गंभीर जखमी झाला आहे. प्रारंभी अपघात झाला असता, हे दोन्ही युवक गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले होते. त्यांना स्थानिक ग्रामस्थांच्या सहाय्याने मेहकर येथे हलविण्यात आले असता, डॉक्टरांनी अशोक पायघन याला मृत घोषित केले, तर राजू मुके याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. राजूच्या पायाला व हाताला जबर मार लागलेला आहे. पोलिसांनी दोन्हीही वाहने ताब्यात घेतली होती. अपघातांच्या या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

https://breakingmaharashtra.in/warvand_accident/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!