मेहकर (अनिल मंजुळकर) – मेहकर विधानसभेचे आमदार संजय रायमुलकर यांनी दलित समाजातील साबरा गावाचे ग्रामपंचायत सदस्य गजानन वानखेडे यांना अश्लील व घाणेरड्या भाषेमध्ये शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप काही दिवसांपासून व्हायरल होताना दिसत आहे. ते एका संवैधानिक पदावर असून, त्यांच्या तोंडून अशी भाषा अशोभनीय आहे. त्यांच्या निषेधार्थ मेहकरात सर्वपक्षीयांच्यावतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. रायमुलकर यांचा तीव्र निषेध करण्यात आला व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
निषेध मोर्चाच्या सुरूवातीला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून या निषेध मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे नारे देत आमदारांच्या त्या वक्तव्याचा निषेध करत निषेध मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी प्रामुख्याने विधानसभा काँग्रेस पक्ष नेते अॅड. अनंतराव वानखेडे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणदादा घुमरे, ज्येष्ठ नेते अर्जुनदादा गवई, ज्येष्ठ नेते सोपानदादा देबाजे, सेवा दलाचे राज्य सरचिटणीस शैलेश बावस्कर, शिवसेना तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, शिवसेना शहरप्रमुख किशोर गारोळे, माजी नगरसेवक प्रा. डी. जी गायकवाड सर, वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते महेंद्र पनाड, प्रा. आबाराव वाघ, युवा सेना तालुकाप्रमुख अॅड. आकाश घोडे, विलास शिंदे, प्रा.संजय वानखेडे, अॅड. संदीप गवई, विकास पवार, माजी सरपंच गजानन जाधव, सुनिल अंभोरे, अॅड. बबनराव वानखेडे, छोटू गवळी, नामदेव राठोड, नारायण इंगळे आदी उपस्थित होते. यावेळी निवेदन देताना अॅड. अनंतराव वानखेडे यांनी संबोधित केले, की आमदार हे पद संवैधानिक असून, या पदाला ही भाषा न शोभणारी आहे. सामान्य मतदार भयभीत झाला आहे. त्या पत्राचा कसून तपास झाला पाहिजे व संबंधितावर कडक कारवाई झाली पाहिजे, व आमदाराच्या त्या वक्तव्याचा मी निषेध करतो.
यावेळी अनिल म्हस्के, पँथरचे अध्यक्ष पंकज वाघ, भीमराव गवई सर, प्रतिक देबाजे, आकाश अवसरमोल, सुखदेव ढाकरके, शुभम खिल्लारे, संजय पवार, सुनील ढाकरके, संघपाल ताजने, लिलाबाई कटारे, कुसुमबाई तेलंग, लक्ष्मीबाई वानखेडे, सखुबाई गवई, वाठोरे आजी, लक्ष्मीबाई भिमराव वानखेडे, सावित्रीबाई देबाजे, मिराबाई ढाकरके, शारदाताई मोरे, धनंजय कंकाळ, जगन काकडे, विवेक इंगळे, दीपक मोरे, संघपाल ताजने, संतोष लाड, मधुकर वानखेडे, संतोष सरदार, यादवराव वानखेडे, विशाल गवई, उमेश राठोड, भीमराव गवई, भीमराव वानखेडे, पुंजाजी मोरे, प्रवीण गवई, संतोष खरात आदी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.