AalandiPachhim Maharashtra

आळंदी मंदिरात एकादशीदिनी भाविकांची गर्दी ; पुष्प सजावट

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : अधिकमास आणि कमला एकादशी निमित्त परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रमांतुन मंदिरात एकादशी भक्तिमय उत्साहात साजरी करण्यात आली. तीर्थक्षेत्र आळंदीत नेहमी हजारो भाविकांची श्रींचे दर्शनास होणारी गर्दी यावेळी वाढलेली पाहण्यास मिळाली. मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती. श्रींचे वैभवी थेट दर्शन व्यवस्था आळंदी संस्थानने सोशल मीडियाचे माध्यमातून देखील केली. अधिक मास आणि कमला एकादशी दिनी हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेत नगरप्रदक्षिणा केली. इंद्रायणी नदीवर स्नान तसेच दीप दान करीत अधिकमास माहात्म्य जोपासले.

आळंदी मंदिरात एकादशी निमित्त श्रींचे वैभवी गाभा-यात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती. या निमित्त मंदिरात हरिपाठ, कीर्तन सेवा, भजन,जागर सेवा होत असल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. मंदिरात परंपरेने धार्मिक उपचार श्रीची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य असे धार्मिक कार्यक्रम झाले. मंदिरा बाहेर मात्र काही वारकरी, भाविकांनी महाद्वारातून श्रींचे मुख दर्शन घेत नगरप्रदक्षिणा करीत स्थान माहात्म्य जोपासले. मंदिरात भाविकांची गर्दी वाढल्याने दर्शनबारी भक्ती सोपण पुलावर गेली होती. अशी माहिती माऊली घुंडरे पाटील यांनी दिली. मंदिरात परंपरेने प्रसाद वाटप उत्साहात करण्यात आला. यासाठी सेवक, सुरक्षेसाठी पोलीस, सुरक्षा रक्षक यांनी सुव्यवस्थेसाठी परिश्रम घेतले. आळंदी सिद्धबेट अधिक मास उत्सव समितीचे वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह शृंखलेत एकादशी दिनी महावैष्णव वारकरी शिक्षण संस्थेचे तर्फे ह. भ.प. कल्याण महाराज कल्याणकर यांची हृदयस्पर्शी वाणीतून सुश्राव्य कीर्तन सेवा हरिनाम गजरात झाली. यावेळी उद्योजक राहुल चव्हाण, सचिन महाराजशिन्दे, गोविंद ठाकूर, माऊली घुंडरे, ज्ञानेश्वर महाराज जाधव, दिनकर तांबे आदींसह वारकरी, भाविक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!