BULDHANAMEHAKARVidharbha

आ. संजय रायमुलकरांची ग्रामपंचायत सदस्याला अश्लील शिवीगाळ!

– त्या कार्यकर्त्यानेही मला आईवरून शिवीगाळ केली – आ. रायमुलकर

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – मेहकर-लोणार मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी साब्रा येथील ग्रामपंचायतीच्या दलित समाजातील सदस्याला अश्लील शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे, ही ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मतदारसंघात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, संबंधीत सदस्याने आपल्याला अगोदर एकेरी भाषेत बोलल्याने व आईवरून शिवीगाळ केल्याने आपण संतापल्याचे आ. रायमुलकर यांनी स्पष्ट केले आहे.

  • आमदार रायमुलकर म्हणतात, त्याने आईवरून शिवी दिली…..

मेहकर येथे लवकरच राज्य सरकारचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची पास मागण्यासाठी साब्रा येथील ग्रामपंचायत सदस्य गजानन वानखेडे यांनी आ. संजय रायमुलकर यांना फोन केला होता. आमदार रायमुलकर हे मुंबईत असल्याने वारंवार येणार्‍या फोनमुळे चिडले आणि त्यांनी वानखेडे यांना अश्लील शिवीगाळ केली. त्या शिविगाळचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मतदारसंघात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, आमदार रायमुलकर यांनीही आपली बाजू मांडली. संबंधित कार्यकर्त्याने आपल्याला आईवरून शिवीगाळ केली होती. तसेच, काही दिवसांपूर्वी आपल्याला एक अत्यंत घाणेरडे पत्र आले होते, ते आपण पोलिसांना दिलेले आहे. या पत्राचा उल्लेख या कार्यकर्त्याने केल्याने हे पत्रदेखील त्याने लिहिले असावे, असे आ. रायमुलकरांनी सांगितले.

https://www.instagram.com/tv/Cv0HkXFAhyQ/?igshid=NjZiM2M3MzIxNA%3D%3D

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!