BULDHANAHead linesVidharbha

मुख्य कार्यकारी अधिकारी शाळेला भेट देतात तेव्हा!

बुलढाणा (प्रशांत खंडारे) : बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते यांनी आज (दि.12) तालुक्यातील मढ या गावी जेव्हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला अचानक भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी गप्पागोष्टी केल्या तेव्हा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आश्चर्यमिश्रित आनंदाचे भाव पाहण्यासारखे होते.

आज दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी श्रीमती विसपुते यांनी दुपारी एक वाजता अचानक मढ या गावी जाऊन तेथील प्राथमिक शाळेला भेट दिली. त्यांनी शाळेतील स्वयंपाकघरात जाऊन मुलांसाठी शिजवण्यात येणाऱ्या पोषण आहाराची पाहणी केली. त्यानंतर त्या थेट वर्गात गेल्या व मुलांशी संवाद साधला मुलांच्या अभ्यासाबाबत, त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधांबाबत मुलांना प्रश्न विचारले, त्यांना असलेल्या अडचणींबाबत आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यांच्या प्रश्नांना मुलांनीही मनमोकळेपणाने उत्तरे दिली. शाळेची स्वच्छता व शिस्तबद्धता याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. स्वयंपाक घराची स्वच्छता ठेवण्याबद्दल मुख्याध्यापकांना सूचना देखील केल्या.
यावेळी श्रीमती विसपुते यांनी मढ येथे उभारण्यात आलेल्या गोबरधन प्रकल्पाची पाहणी केली तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्रालाही भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत मुख्य वित्त व लेखा अधिकारी प्रकाश राठोड,उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवशंकर भारसाकळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सरिता पवार, कार्यकारी अभियंता राहुल जाधव, उपशिक्षणाधिकारी उमेश जैन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!