BULDHANAChikhaliHead linesMaharashtraVidharbha

रेशनच्या धान्याची लाभार्थ्यांकडूनच व्यापार्‍यांना विक्री!

– स्वस्त धान्य दुकानासमोरच होतो व्यवहार;  सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे वास्तव चव्हाट्यावर!

मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे) – केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचे धान्य स्वस्त धान्य दुकानांतून घ्यायचे व ते व्यापार्‍यांना चढ्यादराने विकायचे, असा गोरखधंदा गोरगरीब लाभार्थ्यांनी खेड्यापाड्यात चालविला असून, मेरा बुद्रूक येथे तर हा धक्कादायक प्रकार ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या कॅमेर्‍यातच वैâद झाला. अशाप्रकारे धान्याचा काळाबाजार करून सरकारची फसवणूक करणार्‍या लाभार्थी व व्यापार्‍यांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये तातडीने गुन्हे दाखल करून, त्यांना अटक करण्याची तसेच, या लाभार्थ्यांची रेशनकार्ड जप्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.

चिखली तालुक्यातील मेरा बुद्रूक हे १३ हजार लोकसंख्येचे गाव असून, या गावात सरकारी स्वस्त धान्याची चार दुकाने आहेत. देशातील गोरगरीब माणूस भूकेला राहू नये, त्याच्या पोटासाठी दोन वेळचे अन्न मिळाले पाहिजे, या भावनेतून केंद्र व राज्य सरकारतर्पेâ विविध योजनांद्वारे गेल्या काही वर्षांपासून स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ दिले जाते. अन्नसुरक्षा योजनेत प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य मोफत दिल्या जात असून, जवळपास ग्रामीण भागातील ७० टक्के कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानातून दरमहा धान्य पुरवल्या जाते. पण अनेक लाभार्थी स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेऊन थेट व्यापार्‍यांना विकत असल्याचे आढळून येत असल्याने नेमका या योजनेचा लाभ कोणाला होतो, असा प्रश्न पडत आहे. मेरा बुद्रूक येथे स्वस्त धान्य दुकानांमधून शिधापत्रिका धारकांना धान्य वाटप चालू आहे. परंतु अनेक लाभार्थी स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेऊन व्यापार्‍यांना विकत असल्याचे ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या कॅमेर्‍यात कैद झाले आहे. मेरा बुद्रूक येथील स्वस्त धान्य दुकानातून अनेक लाभार्थी मोफतचे धान्य घेऊन व्यापार्‍यांना १३ रुपये ते १४ रुपये किलोप्रमाणे धान्य विकत असल्याचा प्रकार समोर आला आहे.


चिखली तालुक्यात गावोगावी एजंट सक्रीय, रेशनच्या धान्याची खरेदी जोरात!

चिखली तालुक्यातील निम्म्यापेक्षा अधिक गावांमध्ये लाभार्थ्याकडून धान्य विक्रीचा फंडा सुरू आहे. मेरा बुद्रूकसह आजूबाजूच्या गावांमध्ये व्यापार्‍यांची अनेक पथके प्रत्येक गावामध्ये जाऊन धान्य खरेदी करीत आहेत. मोटरसायकल, लोडिंग अ‍ॅपे आदी वाहनांमधून गावागावांमध्ये ही माणसे पोहोचतात. घरोघरी जाऊन व अनेक स्वस्त धान्य दुकानासमोर उभे राहून लाभार्थ्यांना धान्याबद्दल विचारण्यात केली जाते व लाभार्थ्याकडून धान्य खरेदी केल्या जात आहे. तरी अशा व्यापार्‍यांवर वचक बसविण्यासाठी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई गरजेची आहे. तसेच, जे लाभार्थी धान्य विकत आहेत, त्यांचे रेशनकार्ड तातडीने जमा करून घेऊन त्यांच्यावरदेखील कायदेशीर कारवाईची गरज निर्माण झालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!