BULDHANAHead linesVidharbha

करवसुलीसाठी ग्रामपंचायतींनी ‘टेकले हात’; आता बचत गटांची ‘घेणार साथ’!

– सीईओ भाग्यश्री विसपुते यांचा पुढाकार, ग्रामपंचायतींना धाडले पत्र!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – पैसा सर्व काही काही पण पैशाशिवाय काहीच नाही, असे नेहमीच म्हटल्या जाते. ग्रामपंचायतींचेच पहा ना.. गावातील विविध कामे करण्यासाठी जनरल फंड़ात पैसे गरजेचे आहे. पण वसुली होत नसल्याने ग्रामपंचायती मेटाकुटीला आल्या असून कामे करणेही अवघड़ झाले आहे. तर शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठीदेखील करवसुली ही मुख्य अट आहे. त्यामुळे करवसुलीसाठी आता बचत गटांची मदत घेतली जाणार असून, प्रायोगीक तत्वावर जिल्ह्यातील १२० पंचायत समिती गणांतील १२० ग्रामपंचायतींची निवड़ करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात त्यांनी ग्रामपंचायतींना पत्र धाडले आहे.

ग्रामपंचायत ही स्वायत्त संस्था असून, गाव पातळीवरचे सर्व अधिकार शासनाने ग्रामपंचायतींना दिल्याने ग्रामपंचायतीच्या प्रशासनात कोणीही ढवळाढवळ करू शकत नाही. शासनाचे विविध योजनांचे पैसे ़थेट ग्रामपंचायतींना वळती केल्याने पदाधिकार्‍यांचे महत्त्वदेखील वाढले आहे. असे असताना गावातील निकड़ीची कामे, नाल्या काढणे, पथदिवे लावणे, साफसफाई, रोगप्रतिबंधक फवारणी, किरकोळ दुरूस्ती, कर्मचारी वेतनसह इतर कामे सामान्य फंड़ातून करावी लागतात. त्यासाठी करवसुली होणे गरजेचे आहे. आज रोजी कित्येक ग्रामपंचायतीचा थकीत कराचा आकड़ा लाखोच्या घरात आहे. त्यामुळे कामे करणे जिकरीचे झाले आहे. शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठीदेखील करवसुली ही मुख्य अट आहे. तर वसुली नसल्याने कित्येक गावे विविध योजनापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. शंभर टक्के कर भरल्यास दळण मोफत, आरओचे पाणी कॅन, गरम पाणी, मुलीचे नावे बचतपत्रसह इतर बाबीचा अवलंब करून बर्‍याच ग्रामपंचायतींनी करवसुलीचे उद्दिष्टदेखील पूर्ण केले आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बचत गट, महिला ग्रामसंघ कार्यरत असून, त्यांची मदत घेतल्याससुध्दा करवसुलीसाठी मोठी मदत होईल. त्यादृष्टीने मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी पुढाकार घेतला असून, प्रायोगीक तत्वावर यासाठी जिल्ह्यातील १२० पंचायत समिती गणांतील प्रतिगण एक याप्रमाणे १२० ग्रामपंचायतींची निवड़ केली आहे.

यामध्ये बुलढाणा पंचायत समितीअंतर्गत बिरसींगपूर, सव, भादोला, साखळी, सागवण, तांदुळवाड़ी, जनुना, कुलूमखेड़, सावळी, चांड़ोळ, रूईखेड़ मायंबा, पांग्री, चिखली पंचायत समिती अंतर्गत करवंड़, उंद्री, अमड़ापूर, कव्हळा, ईसोली, मंगरूळ नवघरे, सवणा, शेलूद, केळवद, गोद्री, मेरा खु., शेळगाव आटोळ, मेरा बुद्रूक, कोलारा, मोताळा पंचायत समितीतील धामणगाव बढे, पिं.देवी, राजूर, पान्हेरा, तळणी, शे.बाजार, खरबड़ी, बोराखड़ी, खामगाव पंचायत समितीतील गोंधनापूर, हिवरखेड़, अटाळी, पळशी बु., पिंप्री गवळी, घाटपुरी, काळेगाव, गणेशपूर, पारखेड़, जळका पळसखेड़, बोरी, शिर्ला नेमाने, लांजूड़, सुटाळा बु. देऊळगावराजा पंचायत समितीतील सावखेड़ भोई, तुळजापूर , सिनगाव जहागीर, निमगाव गुरू, अंढेरा, देऊळगावमगी, नांदुरा पंचायत समितीतील अलमपूर,नारखेड़, वड़ी, वसाड़ी बु., धानोरा वि., खुमगाव, वाड़ी, तांदुळवाड़ी, शेगाव पंचायत समितीतील चिंचोली, जवळा बु., भोनगाव, अडसूळ, माटरगाव बु., जलंब, मेहकर पंचायत समितीतील जानेफळ, हिवरा खु., सोनाटी, लव्हाळा, ड़ोणगाव, चायगाव, घाटबोरी, शेलगाव देशमुख, देऊळगाव साकरशा, ब्रम्हपुरी, आरेगाव, कल्याणा, मलकापूर पंचायत समितीतील मोरखेड़ बु., उमाळी, मलकापूर ग्रा., वड़जी, धरणगाव, अनुराबाद, संग्रामपूर पंचायत समितीतील एकलारा बानोदा, वरवट बकाल, पळशी झाशी, चोंढी, सोनाळा, टुनकी, वानखेड, पातुर्ड़ा बु., जळगाव जामोद पंचायत समितीतील आसलगाव, खेर्ड़ा बु., भेंड़वळ बु., उमापूर, पिं.काळे, पळशी सुपो, जामोद, रसूलपूर, सिंदखेडराजा पंचायत समितीतील साखरखेर्ड़ा, ड़ोरव्ही, वरूड़ी, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा, दुसरबीड़, किनगावराजा, अंचली, भोसा, सोनोशी व लोणार पंचायत समितीतील सुलतानपूर, अंजनी खु., वेणी, वढव, पांग्रा ोळे, टिटवी, बीबी व किनगावजट्टू या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सदर करवसुली बचत गट, महिला ग्रामसंघ यांना देण्यास हरकत नसून, ग्रामपंचायत स्वायत्त संस्था असल्याने याबाबतचा निर्णय त्यांनी घ्यावा, असेही सीईओं श्रीमती भाग्यश्री विसपुते यांनी काढलेल्या पत्रात नमूद आहे.


गावोगावीची करवसुली ही किचकट समस्या आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करवसुलीसाठी बचत गट किंवा महिला संघांना काम देण्याची सूचना ग्रामपंचायतींना केली असली तरी, करवसुलीत सर्वात मोठी अडचण ही स्थानिक राजकारण ही आहे. गावपातळीवरील राजकारण हे फार बेरकी असते. त्याचा गैरफायदा हे करबुडवे ग्रामस्थ घेत असतात. शिवाय, गावपातळीवर करवसुलीसाठी काही कारवाईदेखील करता येत नाही. कारवाई करायला गेले तर त्याचा ग्रामपंचायत निवडणूक किंवा स्थानिक संबंधांवर परिणाम होऊन कटूता येत असते. त्यामुळे महिला संघ किंवा बचत गट ही करवसुली करू शकेल का, तसे झाले तर या बचत गटांविरोधांतही तक्रारींचा महापूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!