AalandiPachhim Maharashtra

आळंदीतील शाळांत ओळख ज्ञानेश्वरीची संस्कारक्षम उप्रक्रमास प्रारंभ

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : ओळख श्री ज्ञानेश्वरीची परिवार, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी ,श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था व श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती, आळंदी शहर पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने “ओळख श्री ज्ञानेश्वरीची” – एक स्तुत्य व संस्कारक्षम उप्रक्रम आळंदीतील चार शाळांत सुरु करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध शाळांत शालेय विद्यार्थी यांचे पर्यंत हरिपाठ, श्री ज्ञानेश्वरी संत साहित्य या उपक्रमाचे माध्यमातून सर्वत्र प्रचार , प्रसार करण्यास सुरुवात झाली. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या श्री ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ हे बाल मनाला, तरूणांना संस्कारक्षम आहेत. संत साहित्याचा प्रचार व प्रसार होण्यास परिवाराने हा उपक्रम हाती घेतला आहे. ओळख श्री ज्ञानेश्वरी व हरिपाठ हा शालेय विद्यार्थी व तरूणां करिता संस्कारक्षम असा उपक्रम महाराष्ट्र आणि विशेष करून पुणे जिल्ह्यातील ४३ शाळांत सुरु झाला.

या उपक्रमाचे आळंदीतील किड्झस पॅराडाईज स्कूल ( काळे कॉलनी ) च्या दोन्ही शाळात उद्घाटन ह भ प माऊली दास महाराज, श्रीमती हेमांगी कारंजकर, श्रीमती निर्मलाताई चव्हाण, युवा उद्योजक राहुल चव्हाण, किरण नरके, गट प्रमुख अर्जुन मेदनकर, संस्थेचे संस्थापक अनंत काळे, मुख्याध्यापिका स्वाती काळे, प्रज्ञा काळे यांचे उपस्थिती झाले. यावेळी माऊली दास महाराज यांनी शालेय मुलांना हरिपाठ ज्ञानेश्वरीतील अध्यात्म शालेय जीवनात कसे उपयुक्त आहे. हे मराठीसह इंग्रजी मधील शब्द रचनेचे साहाय्याने सोप्या सरळ भाषेत मुलांना समजेल असे सांगून मुलांसह शिक्षक, उपस्थित यांची दाद मिळवली. यावेळी त्यांनी शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि संस्था चालक यांनी आपापल्या स्वधर्माचे पालन करण्यास आवाहन केले. प्रामाणिक पणे स्वधर्म पालन केल्यास यश निश्चित मिळेल असे सांगितले. यावेळी हेमांगी कारंजकर यांनी ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमाचे बारकावे, नियोजन तसेच यापूर्वी श्री ज्ञानेश्वर विद्यालयात गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या उपक्रमाची माहिती देत उपक्रमाचे आयोजन कसे करायचे, संत साहित्य संस्कारक्षम असल्याने यातून आपले जीवन समृद्ध कसे होईल यावर प्रकाश टाकला., अनंत काळे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यपिका स्वाती काळे, प्रज्ञा काळे यांनी प्रशालेत उपक्रमाचे संयोजन केले.
महंत पुणेकर महाराज संचलित राजे शिवछत्रपती विद्यालयात प्रगती बालक मंदिराच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली उपक्रमाचे उदघाटन झाले. यावेळी गट प्रमुख अर्जुन मेदनकर, श्रीमती हेमांगी कारंजकर, श्रीमती निर्मलाताई चव्हाण, युवा उद्योजक राहुल चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते किरण नरके, मुख्याध्यापक बाळशिराम पवळे, विकास राळे, श्रीमती दिपाली नलवडे, उमेश सोळशे, आदेश खरात, प्रमोद भौरले, राजू आव्हाड, अशोक आव्हाड, विजय साळुंखे, संजय पवळे, रमाकांत चव्हाण आदी उपस्थित होते. आळंदी देवस्थानने या उपक्रमाचे पालकत्व स्वीकारले असून संत साहित्याचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी संस्थान तर्फे सार्थ ज्ञानेश्वरी, श्री ज्ञानेश्वरी पारायण प्रत, हरिपाठ उपलब्ध करून दिले आहे. यावेळी देवस्थानचे प्रतिनिधी व पदाधिकारी यांचे हस्ते सहभागी शाळांना संत साहित्य, हरिपाठ पेन ड्राइव्ह सुपूर्द करण्यात आले.
श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या श्री ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ हे बाल मनाला, तरूणांना संस्कारक्षम असल्यामुळे प्रचार व प्रसार होण्यासाठी परिवाराने हा संस्कारक्षम उपक्रम सुरु केला. या उपक्रमाचा भाग म्हंणून विद्यालय येथे हा उदघाटन हरिनाम गजरात झाले. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणा समवेत आध्यत्मिक शिक्षणाची जोड दिल्यास सुसंस्कारक्षम, चारित्रसंपन्न, मानवीय जीवनाची मूल्य जोपासणारी विनयशील नवीन पिढी तयार होणार असल्याने हा उपक्रम सर्वत्र एकाच वेळी सुरु करण्यात येत असल्याचे मुख्याध्यापिका निर्मला चव्हाण यांनी सांगितले. मुख्याध्यापक बळीराम पवळे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक श्रीमती हेमांगी कारंजकर यांनी केले. सूत्रसंचालन अशोक आव्हाड यांनी केले. आभार विकास राळे यांनी मानले. हरिनाम गजरात उपक्रमास प्रारंभ झाला. पसायदानाने उदघाटन सोहळ्याची  सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!