– कृषीपंप लाईन, गावठाण लाईन चक्क एकाच पोलवर, तर बर्याच ठिकाणी क्रॉसिंग!
मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे) – चिखली तालुक्यातील मेरा खुर्द सबस्टेशन अंतर्गत येणार्या मेरा बुद्रूक फाटा चौकातील महावितरण कंपनीची डीपी (रोहित्र) भरचौकाच्या बाजूला असल्याने त्या डीपीचा फेजबॉक्स १५ ते २० महिन्यांपासून जळालेल्या अवस्थेत व डीपीतून विद्युत प्रवाह चालू असलेल्या वायरला चपलेची पाचर लावलेल्या अवस्थेत उघडा आहे. महावितरण कंपनीची डीपी चौकाच्या बाजूने रोड लगत असल्याने त्या ठिकाणावरून येणार्या जाणार्या लोकांची संख्या जास्त आहे. त्यामध्ये शाळकरी मुली, मुले, वयोवृद्ध मंडळी यांची नेहमीच वर्दळ असल्याने या डीपीवरील जळालेल्या अवस्थेत असलेल्या फेज बॉक्स मोठ्या अपघाताला निमंत्रण देत आहे. तरी महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकार्यांना जळालेल्या अवस्थेत असलेला फेज बॉक्स बदलून त्या ठिकाणी नवीन फेज बॉक्स टाकण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने महावितरणच्या कर्मचार्यांना त्या फेजबॉक्सवर पाणी पडत असल्याने काम करत असताना अडचणी येत आहे. तरी महावितरण कंपनी मेरा बुद्रूक फाटा चौकातील डीपीवरील फेजबॉक्स बसवतील का, असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहे. ह्या गावठाण डीपीवरून मेरा बुद्रूक फाटा वस्तीवर लाईन जात आहे, एलटी गावठाण चक्क एजी लाईनच्या काही ठिकाणी क्रॉसिंग आहे, तर एकाच विद्युत पोलवर दोन्ही लाईनचा सप्लाय आहे. एजी लाईनचे १० ते १५ घरावरून तार असल्याने तिथे सुद्धा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, गावठाण व कृषीपंप लाईन क्रॉसिंग असल्याने सोसाट्याचा वारा सुटल्यास दोन्ही लाईनीचे तारे एकमेकाला घासून घर्षण होते व त्याच्या ठिणग्या खाली पडतात. या ठिणग्या रस्त्यावर किंवा घराच्या छतावर अनेक लहान मुले खेळत असताना हे असे प्रकार घडत आहे. गावठाण लाईनवर महावितरणच्या कर्मचार्यांना काम करायचे असल्यास कृषीपंपाची डीपी बंद करावी लागते, गावठाण लाईनवर काम करायचे असल्यास कृषीपंपाची डीपी बंद करावे लागते.
एवढे असतानासुद्धा महावितरण कंपनीचा मेरा बुद्रुक फाटा वस्तीवर नुसता भोंगळ कारभार चालू आहे. महावितरण कंपनीने गावठाण व कृषीपंपाची लाईन वेगवेगळी करण्याची उपाययोजना मेरा बुद्रुक फाटा वस्तीवर केली नसल्यानेसुद्धा महावितरण कंपनी स्वतःच्याच कर्मचार्यांचा जीव धोक्यात घालत तर नाही ना, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. महावितरण कंपनीच्या अधिकार्यांनी डीपीभोवती सुरक्षा म्हणून चारही बाजूला सुरक्षा कठडे बसवावेत, जेणेकरून मुकी जनावरे आणि माणसाचे अपघातापासून संरक्षण होईल, अशी मागणीही सर्वस्तरावरून होत आहे. महावितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी या चाललेल्या गलथान कारभारावर काय उपाययोजना करतात, याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.