मेरा बुद्रूक, मलकापूर पांग्रा येथे भव्य मिरवणुका, मान्यवरांनी केले अभिवादन
– चिखलीत मातंग समाजासाठी भव्य सभागृह उभारणार – आ. श्वेताताई महाले
बुलढाणा (संजय निकाळजे/कैलास आंधळे/ डॉ. गजानन उबाळे) – लोकशाही अण्णा भाऊ साठे यांची जयंती जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त चिखली येथे आरोग्य तपासणी शिबीर पार पडले. या शिबिराचा ३००हून अधिक नागरिकांना लाभ झाला. तर चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांनी चिखली शहरात मातंग समाजासाठी सभागृह उभारण्याची घोषणा केली. मेरा बुद्रूक येथे अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथीही उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत जातीय सलोखा कायम असल्याचे दिसून आले. अंढेरा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथेदेखील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त गावातून भव्य मिरवणूक निघाली होती. चिखली येथून जवळच असलेल्या शेलुद येथील वीर लहुजी आखाडा ग्रुपने शेलूद ते चिखली भव्य मोटरसायकल रॅली काढून चिखलीकरांचे लक्ष वेधले.
चिखली येथे सत्यशोधक अण्णा भाऊ साठे बहुउद्देशीय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त भव्य महाआरोग्य शिबिर १ ऑगस्ट रोजी पंचायत समिती सभागृह येथे संपन्न झाले. फाउंडेशनचे अध्यक्ष छोटू कांबळे यांनी आयोजित शिबिराचे उद्घाटन विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्याहस्ते झाले. सर्वप्रथम आमदार सौ.श्वेताताई महाले पाटील यांनी व उपस्थित मान्यवरांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटिल म्हणाल्या की, लवकरच चिखली शहरात मातंग समाजासाठी सभागृह उभारणार असल्याची घोषणा जयंतीनिमित्त केली. शिबिरात ३०० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवून आपल्या आरोग्याची तपासणी व औषधोपचाराचा लाभ घेतला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मा.सभापती सौ. सिंधुताई तायडे, चिखली पोलीस स्टेशन ठाणेदार संग्राम पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष कृष्णा सपकाळ, शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, संतोष काळे, भाजप नेते शेख अनिस भाई, माजी नगरसेवक गोविंद देव्हडे, दत्ता सुसर, अनमोल ढोरे, अॅड. सजीव सदार, मनसे नेते शैलेश गोंधने, पत्रकार कैलास गाडेकर, युसूफ शेख, कैलास शर्मा, मंगेश पळसकर, इफ्तेखार खान, भरत जोगदंडे, तुषार भावसार, सिध्देश्वर ठेंग, विजय खरे, मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते रामदास कांबळे, अंकुश कांबळे, सुभाष कांबळे, प्रवीण कांबळे, नितिन साळवे, रमेश साळवे , शाम साळवे, गोपाल साळवे, मोहन तायडे, महादू भालेराव, मोहन नाटेकर, पंडित कांबळे , रमेश घाडगे, संतोष घाडगे, योगेश साळवे, सागर खरात, गणेश तायडे, सुभाष घाडगे, सुरेश अंभोरे, सोनू गायकवाड, लखन नाडे, फाउंडेशनचे अध्यक्ष छोटू कांबळे, उपाध्यक्ष दिलीप काळे, सचिव कृष्णा साळवे, सहसचिव सौ. प्रतिभा कांबळे, कोषाध्यक्ष आकाश साळवे, सदस्य सुनील गायकवाड, सागर कांबळे यांच्यासह सकल मातंग समाजातील महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पंचायत समिती जवळील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला सर्वपक्षीय व संघटनेंकडून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
चिखली शहरात मातंग समाजाची संख्या चांगली आहे. गत अनेक वर्षापासून मातंग समाजाला स्वातंत्र्य सभागृह देण्यात यावे, अशी मागणी होती. समाजाची मागणी लक्षात घेऊन चिखली शहरात मोठे सभागृह लवकरच उभारू, अशी घोषणा शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटिल यांनी केली. दरम्यान, मोफत आरोग्य शिबिरात चिखली शहरातील नामांकित आणि तज्ञ डॉक्टरांनी आपली निस्वार्थ आणि मोफत सेवा दिली. यामध्ये डॉ.पंढरी इंगळे, डॉ. प्रशांत चिंचोले, डॉ. चित्तरजंन रिंढे , डॉ. सागर चिंचोले , डॉ. नेहा चिंचोले, डॉ. प्रसाद निकम , डॉ. शंतनु देशमुख, डॉ. धनश्री देशमुख, डॉ. धनजय परिहार , डॉ. सचिन खरात , डॉ. शिवशंकर खेडेकर , डॉ. योगेश काळे , डॉ. जयेश काच्छवाल, डॉ. महेश अहिर ,डॉ. सुरज गवारे, डॉ. स्वप्नील परिसकर, डॉ. अजय असे, डॉ. कोमल देशमुख , डॉ. दिपाली हिवाळे, डॉ. दुर्गा जराटे, डॉ. जयश्री परीहार तसेच ग्रामीण रुग्णालय चिखली आणि डॉ. हेडगेवार आयुर्वेदिक रुग्णालय येथील तज्ञ डॉक्टर व आदी कर्मचारी वृंद यांचा समावेश होता.
चिखली तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली मेरा बुद्रुक येथील ग्रामपंचायत कार्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी मेरा बुद्रुक नगरीचे उपसरपंच दिनकरराव डोंगरदिवे तर प्रमुख उपस्थितीमध्ये सरपंच सौ.अनिताताई वायाळ, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण पडघान, भरत पडघान राष्ट्रवादीचे नेते तथा ग्रामपंचायत सदस्य गजानन वायाळ, सचिव प्रदीप साळवे,संतोष तोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभ्ााऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन व हार अर्पण करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करताना लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. राष्ट्रवादीचे नेते तथा ग्रामपंचायत सदस्य गजानन वायाळ यांनी आपल्या मनोगतात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक या महान पुरुषाबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाच्या प्रसंगी गावातील चेतन तोडे, संदेश चव्हाण, मारुती तोडे, सुधाकर कुमठे, ग्रामपंचायत कर्मचारी सखाराम खरडे, मुबारक शाह सह गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची सायंकाळी सहा वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची ट्रॅक्टर ट्रॉली मधून भव्य मिरवणूक गावांमधून काढण्यात आली. गावामधून निघालेल्या मिरवणुकीमध्ये सर्व समाजातील तरुणासह महिला मंडळींनी सहभाग नोंदविला. या मिरवणुकीत गावातील सर्व समाजातील तरुणासह,पुरुष मंडळींनी अनेक गीतावर ठेका धरला. त्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते तथा ग्रामपंचायत सदस्य गजानन वायाळ हे सुद्धा होते. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयकाराने आणि जयघोषाने मेरा बुद्रुक नगरी दणाणून गेली होती. अण्णाभाऊ साठे यांची मिरवणूक मेन चौकात आल्यानंतर सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला राष्ट्रवादीचे नेते तथा ग्रामपंचायत सदस्य गजानन वायाळ यांनी पूजन करून हार अर्पण केला, तसेच मेरा बुद्रुक चे पोलीस पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करून हार अर्पण केला. सरपंच सौ.अनिताताई वायाळ यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले, त्यांच्यासोबत पोलीस कर्मचारी हरिहर गोरे,रामेश्वर आंधळे,मेरा बीटचे देठे साहेब,खार्डे सह गावातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेकांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीमध्ये ठीकठिकाणी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक पुरुष व महिला मंडळींनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. मेरा बुद्रुक मध्ये निघालेल्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या मिरवणुकीमध्ये अंढेरा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मेरा बुद्रुकचे बिट जमादार देठे यांनी मिरवणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये व मिरवणूक शांततेत पार पाडावी, यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता.
सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गावामध्ये डीजेच्या तालावर सर्व समाजातील बांधवांनी आनंद उत्सवामध्ये ताल धरला होता. गावामधून निवडणूक शांततेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेवर सायंकाळी सहा वाजता पोहोचली. साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे नंदकिशोर काळे व मलकापूर पांग्रा बीटचे जमादार निवृत्ती पोपळे साहेब यांनी गावचे पोलीस पाटील पांडुरंग सोनवणे सह अनेकांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. या कार्यक्रमाचे आयोजन मा. ग्रामपंचायत सदस्य दिनकर बावरे, देविदास बावरे, गजानन उबाळे, बाबुराव भालेराव, लखन निकाळजे, मधुकर निकाळजे, श्रीराम निकाळजे, रामदास घनगाव, किशोर बावरे, सुधाकर निकाळजे, गणेश बावरे, रवींद्र निकाळजे, शिवा निकाळजे, सामाजिक कार्यकर्ते संदीप निकाळजे, भास्कर निकाळजे, राम निकाळजे, विष्णू बावरे, ज्ञानेश्वर उबाळे व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे मित्र मंडळ मलकापूर पांगरा यांनी केले होते.
—————