BULDHANAChikhaliHead linesMEHAKARVidharbha

देऊळगावराजा येथे रविवारी पांचाळ सुतार समाजाचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा

– सुतार महामंडळ मंजूर करून घेतल्याबद्दल आ. डॉ. रायमुलकर यांचा होणार समाजगौरव

चिखली (विनोद खोलगडे) – विश्वकर्मा सुतार समाज समन्वय समिती, बुलढाणा तसेच विश्वकर्मा बहुउद्देशीय संस्था, देऊळगावराजा यांच्या संयुक्त विद्यमाने सुतार समाजातील दहावी, बारावी, पदवी तसेच पदविका शिक्षणात गुणवान ठरलेल्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी (दि.३०) देऊळगावराजा येथील कुंभारी परिसरातील संत गजानन महाराज भक्तनिवास येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी सुतार महामंडळ मंजूर करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणारे मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांचाही समाजाच्यावतीने कृतज्ञतापूर्वक समाजगौरव होणार आहे.

या कार्यक्रमाला जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव, माजी मंत्री तथा सिंदखेडराजाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, आ. डॉ. संजय रायमुलकर, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे, जालनाचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ (IAS), माजी सचिव बिपीन सुतार, सुतार समाज समन्वय समितीचे राज्य समन्वयक पी. जी. सुतार यांची यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे. तरी, सुतार समाज बांधवांनी संत गजानन महाराज भक्तनिवास कुंभारी परिसर, देऊळगावराजा जिल्हा बुलढाणा, येथे आयोजित या सोहळ्याला बहुसंख्य समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमानंतर समाजबांधवांसाठी स्नेह भोजनाचेदेखील आयोजन करण्यात आलेले आहे.


मेहकर-लोणार मतदारसंघाचे आमदार तथा सुतार समाजाचे भूषण डॉ. संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नामुळे ओबीसी प्रवर्गात असलेल्या सुतार समाजासाठी स्वतंत्र सुतार महामंडळ मंजूर करण्याची घोषणा राज्यातील शिंदे-पवार-फडणवीस सरकारने केली आहे. यानिमित्ताने कष्टकरी असलेल्या या समाजाला आर्थिक प्रगतीची दारे खुली होणार आहे. यानिमित्ताने डॉ. रायमुलकर यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून या कार्यक्रमात त्यांचा समाजगौरव केला जाणार आहे.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!