– चेहरा, पाठीवरील मुरूमाने परेशान झालेल्या तरुण-तरूणींना उपयुक्त ठरणारे शिबीर
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील हिवरा आश्रम येथे येत्या रविवारी (दि.३०) स्व. शेषराव दाजीबा चनखोरे, बोरी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भव्य मुखदुषिका (मुरूम) निदान व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर्स त्यात डॉ. सुनील बोरकर, डॉ. जगदिश पाटील, डॉ. नंदकिशोर काळे हे आपली सेवा देणार आहेत.
आहारातील असमतोल, बदलती जीवनशैली यामुळे अपचनाच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्याचा परिणाम त्वचेवर होत असून, त्वचा विकाराचे प्रमाण वाढले आहे. चेहरा, पाठ, छातीवरील मुरूमाच्या समस्यांमुळे तरूण मुला-मुलींच्या विविध समस्या निर्माण होत आहेत. या समस्येवर हिवरा आश्रम येथे आयोजित निदान व चिकित्सा शिबिरात आयुर्वेदिक पद्धतीने उपचार केले जाणार आहेत.
ज्या युवक-युवतींना, किंवा स्त्री-पुरूषांना चेहरा, पाठ, छाती, डोक्याला खाज येणे, मुरूम व गाठी तयार होणे, त्यात रक्त, पू, व पाणी होणे, चेहरा, पाठ, छाती काळवंडणे, आणि १६ वर्षांवरील सर्व तरूण मुले-मुली व महिला यांनी आपली नोंदणी या शिबिराकरिता करायची आहे. त्यासाठी अरूण जाधव, गौरव फार्मसी, हिवरा आश्रम, ता. मेहकर, जि. बुलढाणा (संपर्क ९८८१३९२५१३) येथे संपर्क करायचा आहे. हे निदान व तपासणी शिबिर आव्हाळे हॉस्पिटल, हिवरा आश्रम येथे सकाळी ९ ते ३ वाजेपर्यंत पार पडणार असल्याचे डॉ. नंदकिशोर काळे यांनी कळविले आहे.
———–