BuldanaDelhiPolitical News

शिंदे -फडणवीस सरकारमध्ये भाजपला 25 तर शिंदेगटाला 13 मंत्रीपदे मिळू शकतील ? अमित शहा, शिंदे-फडणवीसामध्ये दिल्ली दरबारी झाली खलब्बत!

दिल्ली(ब्रेकींग महाराष्ट्र ) महाराष्ट्रामध्ये शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होवून जवळपास आठवडा झाला. सरकार स्थापन झाल्यानंतर आता सर्वांनाच मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. 9 जुलैच्या रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर असून त्यांची राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार तसेच खातेवाटपावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
          राज्य सरकारला केंद्राचा पाठिंबा तसेच सहकार्य मिळावे यासाठी ही सदिच्छा भेट असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या भेटीत मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी अमित शाह यांना विठ्ठल रखुमाईची खास मूर्ती भेट दिली. राज्यात शिंदे गट- भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता सर्वांनाच मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. शिंदे यांच्या मंत्रिमंडळात शिंदे गटाला किती मंत्रिपदे मिळणार आणि भाजपाच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. याच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिंदे-फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. आज 9 जुलै रोजी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांचीदेखील भेट घेणार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला खास महत्त्व प्राप्त झाले आहे.
             प्राप्त माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात भाजपाला २५ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. तर १३ मंत्री हे एकनाथ शिंदे गटाचे असू शकतात. भाजपा पक्षाकडून बहुतांश नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून भाजपातर्फे खातेवाटप केले जावू शकते. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा प्रश्न थेट दिल्ली दरबारी गेल्यामुळे शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कोणत्या नेत्यांचा समावेश होवू शकतो? भाजपाला कोणती खाती दिली जातील? याची उत्सुकता सर्वांनाच लागली असून शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदारांना मंत्रिपदाची डोहाळे लागले असून त्यांचे कार्यकर्ते तसे कॅम्पेन सुध्दा करीत असल्याचे सोशल मिडीयावरुन पाहयला मिळत आहे.
       

बुलडाणा जिल्ह्यात शिवसेनेचे आ.डॉ.संजय रायमूलकर की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे आ.संजय गायकवाड या दोघांपैकी कोणाला तर भाजपाचे आ.डॉ.संजय कुटे यांचे मंत्रिपद जवळपास निश्चीत झाले असून भाजपामध्ये एकूण 12 महिला आमदार निवडून आल्या आहेत, त्यापैकी चिखली मतदार संघाच्या सौ.श्वेताताई महाले पाटील असून त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तविला जात आहे, मात्र एकाच जिल्ह्यात भाजपाला दोन मंत्रीपदे कसे मिळतील? यामुळे श्वेताताई महाले यांच्या लाल दिव्याची आशा मात्र धुसर होण्याची शक्तता राजकीय वर्तूळात चर्चिला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!