खामगाव -(ब्रेकिंग महाराष्ट्र) बुलडाणा जिल्ह्यात अवैध धंद्यांना उत आला आहे. वरली, जुगार , विनापरवाना दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे याकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत आहे. गुटखा तर मोठ्या प्रमाणात शहरात विक्रीस येत आहे . याबाबत पोलीस कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही तर पोलीस हप्ते घेवून अवैध धंद्यांना पाठबळ देत असल्याचे बोलले जात आहे. शासनाने प्रतिबंधीत केलेला व मानवी आरोग्यास असलेला गुटखा विक्री होत असल्याच्या गुप्त माहितीवरून खामगाव शहर पोस्टेच्या गुन्हे शाखेने सोनु स्विट मार्ट दुकानाच्या गोडाऊनवर छापा मारून विमल गुटख्यासह विविध कंपनीच्या सुगंधीत पान मसाला व तंबाखू असा एकूण दीड लाखाचा गुटखा जप्त केला. यावेळी पोलिसांनी एकास अटक केली असून दुकान चालक फरार आहे. ही कारवाई ८ जुलै रोजी दुपारच्या सुमारास जलालपुरा भागात करण्यात आली. या कारवाई मुळे गुटखा माफियामधे खळबळ उडाली आहे.
८ जुलै रोजी खामगाव गुन्हे शोध पथकाचे पीएसआय ओमप्रकाश मिश्रा हे गस्तीवर असतांना त्यांना शासनाने प्रतिबंधीत केलेला मानवी आरोग्यास अपायकारक असलेला गुटखा विक्री होत असल्याची व साठवून ठेवलेला असल्याची गुप्त माहिती मिळाली. या मािहतीवरून शहर पोस्टेचे ठाणेदार प्रदिप त्रिभुवण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने दुपारच्या सुमारास जललापुरा भागातील सोनु स्वीट मार्ट दुकानाच्या गोडाऊनवर छापा मारला असता दुकानामध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, विविध कं लपनीचे सुगंधीत पान मसाले, सुंगधीत तंबाखू असा एकूण १ लाख ५१ हजार ९० रूपयांचा मुद्देमाल मिळून आला. त्यावेळी पोलिसांनी सय्यद मनसूर सय्यद गनी वय २६ रा. बर्डे प्लॉट यास अटक केली आहे. दुकान मालक फरार होण्यास यशस्वी झाला आहे. शहर पोस्टेला सय्यद मनसूर सय्यद गनी व दुकान मालकाविरूध्द कलम ३२८, १८८, २७२, २७३, ३४ भादंविसह कलम अन्न सुरक्षा मानके कायद्या अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई एएसपी दत्त, डीवायएसपी अमोल कोळी, ठाणेदार प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मिश्रा, दिनेश इंगळे, रामेश्वर फासे, अफसर तडवी, दिपक राठोड, प्रफुल्ल टेकाडे, जितेश हिवाळे, अमरदिप ठाकूर, अंकुश गुरूदेव यांनी केली आहे.
विशेष म्हणजे गेल्या 4 ते 5 दिवसापूर्वी खामगाव पोलिसांनी 65 लाख रुपये छुप्या मार्गाने कार मधे घेवून जातांना एएसपी दत्त यांच्या पथकाने पकडले होते. यामधे चालकाविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल केला होता सदर पैसा कशाचा होता याचे कोडे अद्यापही उलगडले नाही तर अवैध धंदे जोमात सुरू आहेत. कारवाई केल्यानंतर माहिती देण्यासाठी पत्रकारांना पोलीस स्टेशन मध्ये येण्यास मज्जाव केला जातो. खुद्द एएसपी श्रावण दत्त हे पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगतात अश्या वेळी अनेक प्रश्न उपस्थित होत आहे . या अगोदर सुद्धा नकली नोटा घेवून जात असताना ए एसपी दत्त यांच्या पथकाने कारवाई केली होती तेव्हा सुद्धा पत्रकारांना माहिती न देता एएसपी दत्त यांनी गेट बाहेर काढले होते. पत्रकारांनी सबंधित अधिकाऱ्यांना माहिती विचारली किंवा बाहेर का काढता तर पोलीस कारवाई आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दखल करण्याची धकमी देतात तर आरोपींची नावे देण्यास टाळाटाळ करतात. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ आहे आहे . तरी सुद्धा पोलीस पत्रकारांना काही जुमानत नाही. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.