ChikhaliVidharbha

पालकांनो, रडण्यापेक्षा लढलेले केव्हाही चांगले!

– चिखलीत मुलींना टार्गेट करण्याचे समाजकंटकांकडून गंभीर प्रकार!

चिखली (तालुका प्रतिनिधी) – चिखली शहर हे शैक्षणिक हब बनत चालल्याने अनेक मुले-मुली येथे शिक्षणासाठी आलेले आहेत. परंतु, काही समाजकंटक मुलींना टार्गेट करत आहेत. काही प्रकरणांत मुलीदेखील फसलेल्या आहेत. अशा परिस्थितीत इज्जतीचा प्रश्न म्हणून पालक शांत बसले तर त्यांना रडण्याचीच वेळ येईल. तेव्हा रडण्यापेक्षा लढण्याला शिका, आम्ही तुमच्यासोबत आहोत, आमच्या कानावर असे प्रकार घाला, आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही शिवसेना (ठाकरे) उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर यांनी पालकवर्गाला दिली आहे.

सद्या चिखली शहरामध्ये अनेक शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस, ट्युशन्स, कॉम्प्युटर क्लासेस, स्पर्धा परीक्षा सेंटर आहेत. त्यामुळे शहरांमध्ये अनेक ग्रामीण भागातील पालक रूम करून आपल्या मुलाला किंवा मुलीला चांगले शिक्षण भेटावे म्हणून राहतात. तसेच शहरातील विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा भरपूर आहे. परंतु गेल्या अनेक दिवसापासून शहरांमध्ये गैरप्रकार आढळून येत आहेत. अल्पवयीन मुला-मुलींमध्ये प्रेम संबंध जुळून येतात आणि ते सर्व सीमा तोडून-मोडून टाकतात. अनेक घटनांमध्ये मुली कॉलेजला चालले, क्लासला चालले असे खोटे सांगून घरून बाहेर निघतात आणि कॅफेमध्ये किंवा त्या मुलांच्या फोर व्हीलर मध्ये फिरताना दिसतात. आणि त्यातूनच हे गैरप्रकार घडतात. अनेक प्रकरणांमध्ये मुली हा अल्पवयीनच आढळल्या आहेत. हे सर्व प्रकार अतिशय गंभीर आहेत. याची दखल घेत शिवसेना (ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर यांनी चिखलीतील सर्व पालकांना एक भावनिक साद घातलेली आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात ते म्हणतात की, गेल्या अनेक दिवसांपासून असे अनेक प्रकार माझ्याकडे तक्रार म्हणून आले. सर्व प्रकारांमध्ये मुलगी अल्पवयीन आहे. काही प्रकारांमध्ये तर मुलगा तीस वर्षाचा आणि मुलगी सोळा वर्षाची पाहायला मिळाली. काही प्रकारांमध्ये मुलगा मुलगी हे वेगवेगळ्या धर्माचेसुद्धा आढळून आले. माझ्याकडे आलेल्या सर्व प्रकरणांमध्ये मी पालकांना न्याय मिळवून दिला. अनेक पालक आपली बदनामी होईल म्हणून घाबरतात. आणि प्रकरण दाबतात. परंतु त्यांच्यावर नंतर फक्त रडण्याची आणि पश्चाताप करण्याची वेळ येते. म्हणून अशी जर कोणाची तक्रार असेल तर त्वरित संपर्क करावा, रडण्यापेक्षा लढलेले केव्हाही चांगले, असे भावनिक आवाहन कपिल खेडेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!