BULDHANAHead linesMEHAKARVidharbha

संतश्रेष्ठ गजाननांची पालखी सोमवारी होणार खामगावहून शेगावकडे मार्गस्थ!

– शेगावकडे जाणारी वाहने जलंब, त्रिंत्रव मार्गे वळवली!

खामगाव/बुलढाणा (बाळू वानखेडे) – पंढरपूरवरून परतीच्या मार्गावर असलेली संतश्रेष्ठ गजानन महाराज यांची पालखी सध्या मेहकर तालुक्यात असून, सोमवारी २४ जुलैरोजी सकाळी हा पालखीसोहळा खामगाववरून शेगावसाठी मार्गस्थ होणार आहे. पालखीसोबत लाखावर भाविक सहभागी असतात. त्यामुळे गैरसोय होऊ नये म्हणून सदर मार्गावरील वाहतूक २४ जुलैरोजी जलंब तसेच तिंत्रवमार्गे वळविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी ड़ॉ. ह. पि. तुम्मोड़ यांनी घेतला असून, तसे आदेश पारीत केले आहेत.

संत गजानन महाराज शेगाव यांची पालखी पंढरपूरवरून परतीच्या मार्गावर असून, २३ जुलैरोजी खामगावात पोहोचणार आहे. सकाळी १० ते दुपारी दोन वाजेदरम्यान बाळापूर नाका ते बसस्टॅड़ ही वाहतूक जनुना, घाटपुरी, एमआयड़ीसी, सुटाळा ते बसस्टॅड़ अशी वळवावी, तसेच खामगाव शहरातून प्रमुख मार्गाने पालखी मार्गक्रमण करणार असून, नॅशनल हायस्कूल येथे मुक्कामी असणार आहे. सदर पालखी २४ जुलैरोजी शेगावकड़े मार्गस्थ होणार आहे. पालखी सोबत लाखावर भाविक सहभागी होत असल्याने गैरसोय होवू नये, यासाठी यादिवशी शेगावकडे जाणारी वाहने सकाळी ४ ते दुपारी ३ वाजेपर्यंत खामगाव बसस्टॅड़ ते शेलोड़ी, तिंत्रवमार्गे शेगाव व खामगाव बसस्टॅड़ ते जलंब नाका, जलंब, खेर्ड़ामार्गे शेगाव अशी वळविण्याचे आदेश जिल्हादंड़ाधिकारी तथा जिल्हाधिकारी ड़ॉ. ह.पि.तुम्मोड़ यांनी संबंधित प्रशासनाला १८ जुलै रोजी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!