Head linesNAGARPachhim Maharashtra

पाथर्डीतून बनावट ओळखपत्राने शेकडो सीमकार्डची विक्री; डीलरच्या मुसक्या आवळल्या!

शेवगाव (बाळासाहेब खेडकर) – बनावट आधारकार्ड तयार करून त्याद्वारे आयडिया व जिओ कंपनीचे शेकडो सीमकार्ड विक्री केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी पोलिसांनी सीमकार्ड विक्री करणारा भालगाव ता. पाथर्डी येथील डीलर आरोपी भागवत बनसोडे यास अटक केली असून, आरोपीने त्याच्या साथीदारांच्या मदतीने विक्री केलेले बनावट सीमकार्ड देशविघातक कामात उपयोगात आणले असल्याची शक्यता पोलिसाकडूनच वर्तविली जात आहे.

Maharashtra Ahmednagar 12 Exam Students Beat Up The Agent For Not Giving A  Copy Of The English Subject | Ahmednagar News : इंग्रजी विषयाची कॉपी न  दिल्याने एजंटला मारहाण केल्याची चर्चा ...सायबर विभागाकडून माहिती मिळाल्यावरून, पोलीस निरीक्षक संतोष मुटूकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे, पो.कॉ.संदीप बडे, पो.कॉ. बटूळे, पो.कॉ.गरगडे यांनी पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील दत्त जनरल स्टोअर्स येथे छापा घातला असता, तेथून बनावट आधारकार्ड वापरून शेकडो सीमकार्ड विशिष्ट लोकांना विक्री करण्यात आल्याचे समोर आले. याबाबत आरोपी भागवत साहेबराव बनसोडे रा.भालगाव ता.पाथर्डी याची अधिक माहिती घेतली असता, आरोपीचे प्रत्यक्षात दुकान नसून तो राहत्या घरातून आयडिया व जिओ कंपनीचे सीमकार्ड विक्री करणारा डीलर असल्याचे समोर आले. आरोपीने विक्री केलेल्या सीमकार्डच्या कागदपत्रांचे रजिस्टर, ओळखपत्र याबाबत विचारणा केली असता, आरोपी भागवत बनसोडे याने पोलिसांना उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी त्याचे घराची झडती घेतली असता त्याने विक्री करता आणलेले हजारो सीमकार्ड तसेच स्कॅनिंगसाठीचे पॉज मशीन, मोबाईल संच आदी मुद्देमाल आढळून आला, तो तपासकामी जप्त करण्यात आला आहे. आरोपी भागवत बनसोडे याने बनावट ग्राहकांची छायाचित्र वापरून, बनावट आधारकार्ड तयार करून अनेक सीमकार्ड वितरीत केले असल्याची तांत्रिक माहिती मिळाल्यावरून आरोपी बनसोडे याच्याविरुद्ध बनावट दस्तावेज बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला पुढील तपासासाठी अटक केली आहे.


  • अत्यंत सुलभरितीने विक्री केले जाणारे मोबाईल सीमकार्ड आरोपीने बनावट आधारकार्ड तयार करून कोणत्या उद्देशाने आणि कोणाला विक्री केले याचा सखोल तपास करणे आवश्यक असल्याने, तसेच आरोपीने विक्री केलेले सीमकार्ड ठराविक नावाच्या लोकांनाच विक्री केल्याची प्राथमिक माहिती असल्याने या सीमकार्डचा उपयोग करून देशविघातक कृत्ये करण्यासाठी केला का? पाकिस्तान, बांगलादेश अश्या शत्रू राष्ट्रातून आलेल्या समाजविघातक लोकांकडे स्थानिक ओळखपत्र नसल्याने त्यांच्यासाठी बनावट ओळखपत्र तयार करून सीमकार्ड विक्री केले का? सीमकार्ड विक्री करण्यासाठी आरोपीने स्वतचा आयडी अनेक डीलरला देवून एकाचवेळी अनेक ठिकाणहून असे सीमकार्ड विक्री केले असल्याची प्राथमिक माहिती असल्याने याबाबत तपासी यंत्रणांनी सखोल तपास करणे आवश्यक झाले आहे.
  • दरम्यान, नगरमध्येही बनावट आधार कार्डचा वापर करून व्हीआय (वोडाफोन-आयडिया) कंपनीचे १०८ सीमकार्ड अ‍ॅक्टिव्हेट करून घेत त्याचे वितरण केल्याचा प्रकार सावेडी उपनगरात घडला आहे. याप्रकरणी अमोल अशोक टिळेकर (वय ३८ रा. आरोहनगर, तागड वस्तीजवळ, पाईपलाईन रस्ता, सावेडी) याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. १२) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याही प्रकरणाचा तपास नगर पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!