BULDHANAChikhaliHead linesVidharbha

गावपातळीवर बूथ कमिट्यांच्या माध्यमातून काँग्रेस मजबूत करणार!

– काँग्रेस हा सर्व समाजाच्या विकासासाठी कटिबध्द असलेला पक्ष – राहुल बोंद्रे
– जिल्हाभर बूथ कमिट्यांचे होणार पुनर्गठण

बुलढाणा/चिखली (महेंद्र हिवाळे) – काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सर्वस्तरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समाजाच्या तळागळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचले पाहिजे. काँग्रेस हा पक्ष सर्व समाजातील घटकांना बरोबर घेवून त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबध्द असलेला पक्ष असून, काँग्रेसचा विचार देशाला चालना देणारा आहे. संपूर्ण देशभरातून मोदी सरकारची हवा आता संपुष्टात आली असून, वातावरण काँग्रेसला अनुकूल आहे. नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळाले. नागरिकांचा हा विश्वास कायम ठेवून जोमाने काम केल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींचा मार्ग अधिक सोपा होईल, त्यासाठी जिल्हाभर बूथ कमिट्यांचे पुनर्गठण करणार असल्याचे प्रतिपादन बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या विस्तारीत कार्यकारणी बैठकप्रसंगी बुलडाणा येथे केले.

सदर बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, आमदार राजेश एकडे, आमदार धीरज लिंगाडे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, प्रदेश सरचिटणीस शामभाऊ उमाळकर, प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभोरे, संजय राठोड, प्रदेश सचिव रामविजय बुरूंगले, डॉ. स्वातीताई वाकेकर, अ‍ॅड.जयश्रीताई शेळके, हाजी दादुसेठ, काँग्रेसचे जेष्ठनेते डॉ. अरविंद कोलते, लक्ष्मणराव घुमरे, पक्षनेते ज्ञानेश्वरदादा पाटील, मनोज कायंदे यांची उपस्थिती होती. हॉटेल रामा ग्रॅण्ड बुलढाणा येथे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या विस्तारीत कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, माजी आमदार राहुल बोंद्रे हे होते. यावेळी पक्षसंघटन वाढीसह विस्तार तसेच मागील काळात केलेल्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर जिल्ह्यातील समृध्दी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप प्रवाशांना जिल्हा काँग्रेसच्यावतीने श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. या आढावा बैठकप्रसंगी बूथ कमिटी, ग्राम काँग्रेस कमिटी तसेच मंडळ समित्या यांची रचना कशा प्रकारे असावी, या संदर्भात मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सुरूवात करण्यात आलेल्या बूथ कमिटी संघटनात्मक अभियान अंतर्गत गांव पातळीवर जावून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी बूथ कमिट्यांची तसेच ग्राम कमिट्यांची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच काँग्रेस कमिटी बूथ कमिट्यांचे पुनर्संघटन करणार असून, या अभियानाची जबाबदारी जिल्हा काँग्रेसने समन्वयक नेमून पदाधिकर्‍यांना दिली आहे.

याप्रसंगी बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे म्हणाले, की काँग्रेस पक्ष संघटन मजबुती आणि काँग्रेसचा विचार सर्व समाजातील शेवटच्या घटकातील नागरीकांपर्यंत पोहोचला पाहिजे. येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होवू घातल्या असून, यश संपादीत करण्याकरीता कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी कामाला लागावे, त्याकरीता बूथ कमिट्या प्रभावीपणे अधिक सक्षम करण्याची गरज आहे. काँग्रेस हा सर्व समाजातील घटकांचा विचार करणारा व सर्वसमाजातील प्रत्येक घटकाला संधी देणारा पक्ष आहे, म्हणून सर्वसामान्यांचा आवाज ऐकल्या गेला पाहिजे, असेही यावेळी राहुल बोंद्रे म्हणाले. यावेळी जिल्हा काँग्रेसच्या जमा खर्चाचे वाचन प्रशासकीय सरचिटणीस सतिश महेंद्र यांनी केले. यावेळी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, शामभाऊ उमाळकर, आमदार राजेश एकडे, आमदार धीरज लिंगाडे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभोरे, संजय राठोड, आदी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. या बैठकीत काँग्रेस अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध क्षेत्रातील नवनिवयुक्त पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सौ. मंगालाताई पाटील, सौ. मनिषाताई पवार, सौ. मिनाताई सातव, सौ. ज्योतीताई ढोकणे, सौ. आरतीताई दिक्षीत, अनिकेत मापारी, शैलश खेडकर, समाधान हेलोड, डिगांबर मवाळ, गणेश पाटील उचाई, नंदुभाऊ बार, चित्राघन खंडारे, तुळशिराम नाईक, सुरेशसिंग तोमर, विष्णू पाटील कुळसुंदर, रिजवान सौदागर, डॉ. माहमंद इसरार, जावेद कुरेशी, गजानन खरात, मिलींद जयस्वाल, संजय पांढरे, अशोकराव पडघान, अ‍ॅड. हरीष रावळ, रामभाऊ जाधव, मोहतेशाम रजा, अ‍ॅड. प्रशांत देशमुख, विजयसिंग राजपूत, वसंतराव देशमुख, अंबादास बाठे, दीपक खरात आदींसह सर्व प्रâंटचे जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीचे सूत्रसंचलन प्रा. सुनिल सपकाळ यांनी तर आभार अ‍ॅड. मोहतेशाम रजा यांनी मानले.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!