AalandiPachhim MaharashtraPune

अलंकापुरी पालखी सोहळ्याची हरिनाम जयघोषात सांगता

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी सोहळा हरिनाम गजरात प्रवेशल्या नंतर एकादशी दिनी गुरुवारी ( दि. १३ ) श्रींचे पायी वारी पालखी सोहळ्याची सांगता मानकरी, वारकरी भाविकांचे उपस्थितीत हरिनाम गजरात हजेरी मारुती मंदिरात दिंडी प्रमुख विणेकरी यांचे अभंगरूपी सेवा रुजू करीत हजेरीच्या कार्यक्रमाने उत्साहात झाली. आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी दर्शनास लाखावर भाविकांनी कामिका आषाढी एकादशी दिनी श्रींचे दर्शनास गर्दी करून दर्शन घेतले. यावेळी परंपरेने कुऱ्हाडे पाटील आणि डॉ. नाईक परिवाराचे वतीने नारळ व प्रसाद वाटते सांगता झाली. आषाढी एकादशी निमित्त श्रींचे मंदिरात तसेच हजेरी मारुती मंदिरात गाभारा आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता.

या प्रसंगी आळंदी संस्थानचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख अँड. विकास ढगे पाटील, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर, बाळासाहेब आरफळकर, श्रींचे सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रंधवे चोपदार, पुजारी अमोल गांधी, राजाभाऊ चौधरी, माजी नगराध्यक्ष मानकरी राहूल चिताळकर पाटील, योगीराज कु-हाडे, योगेश आरू,स्वप्नील कुऱ्हाडे, अनिल कुऱ्हाडे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रीधर सरनाईक यांचेसह दिंडीकरी, विणेकरी मंदिरात उपस्थित होते. परंपरेच्या उपचारात मंदिरात परंपरेने श्रीना पवमान अभिषेख, दुधारती झाली. श्रीना नैवेद्य झाला. यावर्षी श्रींचे पालखीचे नगरप्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. मंदिर प्रदक्षिणेत सोहळ्यातील दिंड्यांतील विणेकरी यांचे अभंग झाले. आषाढी एकादशी तसेच गुरुवार असल्याने मंदिरात दोन वेळा श्रींचे पालखीची मंदिर प्रदक्षिणा आणि एकादशी निमित्त नगरप्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली.

ख-या अर्थाने सोहळ्याची सांगता हरिनाम गजरात झाली. टाळ मृदंगाचा निनाद, हरी नामाचा जयघोष करीत श्रींचा चांदीचा लक्षवेधी मुखवटा फुलांनी सजलेल्या पालखीत विराजमान करीत श्रींचे पालखीची आषाढी एकादशी दिनी वैभवी मंदिर व नगरप्रदक्षिणा झाली. माऊलींचे पायी वारी पालखी सोहळा कालावधीत मंदिरात नित्य नैमित्तिक धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले. ह.भ.प. विष्णू महाराज चक्रांकित परिवार तर्फे हरिपाठावर आधारित कीर्तन सेवा रुजू करण्यात आली. यावेळी उपस्थितांना श्रवण सुखाची ज्ञानभक्तीमय पर्वणी लाभली. आषाढी एकादशी दिना निमित्त आळंदी मंदिरात प्रथा परंपरेचे पालन करीत श्रीची पूजा, आरती, रुद्राभिषेख, पूजा,फराळाचा महानेवेद्य,धार्मिक कार्यक्रम झाले. यासाठी व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रीधर सरनाईक, संजय रणदिवे, श्रीकांत लवांडे, सोमनाथ लवंगे,तुकाराम माने, महेश गोखले , राजाभाऊ चौधरी, बल्लाळेश्वर वाघमारे, पुरुषोत्तम डहाके यांचेसह सेवकांनी विशेष परिश्रम घेतले. श्रींचे पालखीची मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर देवस्थान तर्फे वारी सोहळ्यातील मानकरी यांना नारळ प्रसाद देण्यात आला.

यावेळी याविषयी महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त विकास ढगे पाटील, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर उपव्यवस्थापक तुकाराम माने श्रीधर सरनाईक सोमनाथ लवंगे श्रीकांत लवांडे बल्लाळेश्वर वाघमारे संजय रणदिवे ज्ञानेश्वर पोंदे आदी मान्यवर उपस्थित होते. हजेरी मारुती मंदिरात श्रीचे पालखी सोहळ्यातील सर्व दिंडीकरी यांची अभंग रुपी सेवा होवून हजेरी घेण्यात आली. यावेळी परंपरांचे पालन करीत कुऱ्हाडे पाटील व नाईक परिवार यांचे तर्फे नारळ प्रसाद वाटपाने सोहळ्याची सांगता झाली. यासाठी वसंतराव कुऱ्हाडे, चंद्रकांत कुऱ्हाडे, सुधीर कुऱ्हाडे, डॉ. श्रीकांत कुऱ्हाडे, पंकज कुऱ्हाडे, प्रवीण कुऱ्हाडे यांनी तसेच नवशिव शक्ती तरुण मंडळाने परिश्रम घेतले. हजेरी कार्यक्रमा नंतर श्रींची पालखी मंदिरात हरिनाम गजरात आली. मंदिर प्रदक्षिणा, आरती, मानकरी यांस देवस्थान तर्फे नारळ प्रसाद वाटप झाले. या नंतर श्रींची आरती झाली. नित्य नैमित्तिक गुरुवार ची पालखी ची हरिनाम गजरात मंदिर प्रदक्षिणा झाली. यावेळी आरती, नारळ प्रसाद वाटप झाले. या सोहळ्याचे सांगते दिनी गुरुवार आल्याने श्रींचे पालखीची मंदिरात दोन वेळा मंदिर प्रदक्षिणा उत्साहात झाली. श्रींचे पालखी सोहळयाचे यशस्वीतेसाठी पालखी सोहळ्याचे बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ रंधवे चोपदार, बाळासाहेब चोपदार, माऊलींचे मानकरी योगीराज कुऱ्हाडे, राहुल चीतळकर पाटील, , योगेश आरु, स्वप्नील कुऱ्हाडे, श्रींचे पुजारी राजाभाऊ चौधरी, अमोल गांधी आदींनी परिश्रम घेतले. दरम्यान श्रींचे पालखी सोहळ्याचे काळात शांतता, कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासह, सुरक्षित सुरळीत वाहतूक ठेवण्यास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत वरिष्ठ पोलीस प्रशासनाचे मार्गदर्शनात आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पवार, दिघी आळंदी वाहतूक पोलीस शाखेचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार, दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव, आळंदी पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे आणि पोलीस सेवक, कर्मचारी, अधिकारी यांनी प्रभावी पाने काम पाहिले.


आळंदी पंढरपूर आनंद वारीत स्वच्छतेचीही वारी

अखिल भारतीय मॉं नर्मदा परिक्रमा सेवा संघाच्या वतीने यावर्षी पहिल्यांदाच पंढरपूर वारीमध्ये स्वच्छता अभियानाचा उपक्रम राबविण्यात आला. एक तरी ओवी अनुभवावी याप्रमाणे आयुष्यात एक तरी वारी अनुभवावी. वारीच्या अप्रतिम अनुभूतीची संधी यावर्षी अखिल भारतीय मॉं नर्मदा परिक्रमा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात अनुभवली. त्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जाणवतच होता. एवढ्या मोठ्या विशाल वारीमध्ये आपलं काहीतरी योगदान लाभलं या समाधानाने सर्व सेवक तृप्त झाले होते. या उपक्रमात राष्ट्रीय संयोजक सतीश चौबे, सत्येंद्रजी कुशवाह, मनीषा पटेल, सुरुची नाईक, सुधीर कुलकर्णी, यशश्री तावसे, उपेंद्र पेंडसे, अमेय सोमन, दिलीप महाराज ठाकरे, अशोक महाराज चव्हाण, माधुरी लोणकढी, साधनाताई दीक्षित, कल्पनाताई पाटील यांचे मार्गदर्शन झाले. स्वच्छता वारीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या सर्व सेवक पदाधिकाऱ्यांचे पुणे जिल्हा प्रभारी अर्जुन मेदनकर यांनी आभार व्यक्त केले. या पुढील स्वच्छता मोहीम अधिक मोठ्या प्रमाणात पदाधिकारी साधक, सेवक यांचे उपस्थितीत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!