AalandiHead linesPachhim Maharashtra

जीव धोक्यात घालून पोलिसाने वाचविले भाविक महिलेचे प्राण!

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : पुणे आळंदी रस्त्यावरील दिघी पोलीस स्टेशन हद्दीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा परतत असताना सोहळ्याचे बंदोबस्ता वरील दिघी पोलीस स्टेशनचे अंमलदार रवींद्र पाठे यांनी बंदोबस्ताचे दरम्यान एका महिला भाविकांचे प्राण स्वताचा जीव धोक्यात घालून वाचविले. मात्र या दरम्यान महिला भाविक श्रींचे रथाखाली जात असताना वाचविले. मात्र अंमलदार रवींद्र पाठे यांच्या पाय रथाचे डाव्या चाकाखाली आल्याने ते व त्यांचे सहकारी या घटनेत जखमी झाले.

माउलींचा पालखी सोहळा थोरल्या पादुका मंदिर च्या पूढे आल्यावर एक महिला पालखी रथाचे दर्शन घेण्यास घाई घाईत आली. यावेळी पालखी रथाच्या खाली जात असताना दिसली असता दिघी पोलीस स्टेशनचे अंमलदार पोलीस शिपाई रवींद्र पाठे, आर सी पी प्लाटून पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई राहुल कारंडे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून महिलेस वाचविले. यात रवींद्र पाठे यांचा डावा पाय रथाच्या चाका खाली जाऊन फॅक्चर झाला आहे. तसेच राहुल कारांडे जखमी झाले. वडमुखवाडी जखमी पोलिसांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती आळंदी पोलीस स्टेशचे पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे यांनी दिली.

दरम्यान, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील, दिघी – आळंदी वाहतूक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार, दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव यांनी पालखी सोहळ्या दरम्यान प्रभावी पोळी बंदोबस आणि सुरळीत, सुरक्षित पोलीस बंदोबस्त ठेवल्याने सोहळ्यात अनुचित प्रकार घडला नाही. यामुळे वारकरी संप्रदायातून पोलीस प्रशासनाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!