BULDHANAHead linesVidharbha

“समृद्धी” महामार्गावर सोयीसुविधाच नाही तर मार्ग सुरु करण्याची घाई का केली? – रविकांत तुपकर

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – समृद्धी महामार्ग हा मृत्यूचा मार्ग बनला आहे. या मार्गावर सातत्याने अपघात घडत असून, नागरिकांचे नाहक बळी जात आहेत. १ जुलै रोजी झालेला अपघात हा अत्यंत दुर्दैवी आणि मन अस्वस्थ करणारा आहे. २५ जणांचा अक्षरश: जळून कोळसा झाला आहे, समृद्धी महामार्गावर सोयी-सुविधाच नाही तर मार्ग सुरू करण्याची घाई का केली?, असा प्रश्न शेतकरी नेते रविकांत तुपकर करत तातडीने महामार्गवर सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासह डांबरी कोट करा, अशी मागणी केली आहे.

अपघाताची माहिती मिळताच रविकांत तुपकर यांनी सिंदखेडराजाकडे धाव घेत, अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात जखमीची भेट घेत, त्यांची प्रकृती जाणून घेतली तर जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे मृतदेह ठेवलेले असून, येथे आलेल्या मृतांच्या नातेवाईकांना धीर देत, त्यांचे सांत्वनदेखील तुपकर यांनी केले. मन अस्वस्थ करणारा हा अपघात असून, मृतदेहाची अवस्थाही पहावल्या जात नाही, असे तुपकर यांनी सांगितले आहे.

दरम्यान, ‘इंडियन रोड कॉग्रेस अ‍ॅक्ट ९९’ नुसार महामार्गवर प्रत्येक ५० किलोमीटरनंतर प्रसाधन गृह, गॅरेज, पंचरचे दुकान, प्रवाशांना विश्राम करण्यासाठी जागा, जेवण- नास्त्याची हॉटेल तसेच रुग्णवाहिका आणि प्राथमिक उपचारांची सुविधा असणे आवश्यक आहे. परंतु समृद्धी महामार्गावर अशी कोणतीच सुविधा नाही. या सुविधा पूर्ण होण्याआधी या मार्गावर वाहतूक सुरु करण्याची घाई राज्य शासनाने का केली? असा सवाल रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला.

https://breakingmaharashtra.in/jalil_tupkar/

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या एमएसआरडीसीच्या बैठका घेण्यासाठी वेळ नाही. ‘समृद्धी’वर नवनगर निर्माण करण्याचे टेंडर मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री विलंब करत आहे. समृद्धीवर कोणत्याच सुविधा नसल्याने हा महामार्ग सुरु करण्याची शासनाने केलेली घाई अनेकांचा बळी घेण्यास कारणीभूत ठरली आहे. समृद्धी महामार्गावर डांबरचा कोट आवश्यक आहे, परंतु कंत्राटदाराने तो कोट दिलेला नाही. केवळ मानवी चुकांमुळेच अपघात होत आहेत, असे म्हणने चुकीचे आहे. या अपघातांमागे समृद्धी महामार्गावर कोणत्याच सुविधा नाही, हा महामार्ग प्रवासासाठी अद्याप योग्य नसतांनाही हा मार्ग प्रवासाठी खुला करण्याची चूक शासनाने केली आहे. १ जुलै रोजी घडलेल्या या भीषण आणि दुर्दैवी अपघातानंतर या महामार्गावर तातडीने सोयी-सुविधा उभारण्याची मागणी रविकांत तुपकर यांनी केले आहे.

https://breakingmaharashtra.in/deulgaonraja_ravikant_tupkar/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!