मलकापूर (तालुका प्रतिनिधी) – शहरातील बायपासवर ट्रक व खासगी ट्रॅव्हल्सच्या झालेल्या भीषण अपघातात गरोदर महिलेसह चार जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. ही विवाहिता नऊ महिन्यांची गरोदर होती. ट्रॅव्हल्सला धडक दिल्यानंतर आयशर ट्रक दुभाजकावरील पोलवर जावून धडकले. ज्यामध्ये ट्रकमधील चालक, क्लिनर आणि ट्रॅव्हल्स चालक यांचा जागीच मृत्यू झाला.
सुरतवरून नागपूरकडे जाणार्या खासगी ट्रॅव्हल्सचे मलकापूर बायपासवर टायर पंक्चर झाले. यामुळे ट्रॅव्हल्स रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्याचवेळी पाठीमागून भरधाव येणार्या आयशरने ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिली. यात टायर बदलत असलेल्या चालकाच्या आणि बाजूला बसलेल्या गरोदर महिलेच्या अंगावरून चाक गेले. नऊ महिन्यांची गरोदर महिला अंजली जाधव हिचा उपचारादरम्यान बुलढाणा येथे मृत्यू झाला. अंजली जाधव ह्या सुरतवरून आपल्या माहेरी प्रसूतीसाठी जात होत्या. ट्रॅव्हल्सला धडक दिल्यानंतर आयशर ट्रक दुभाजकावरील पोलवर जाऊन धडकला. ज्यामध्ये ट्रकमधील चालक, क्लिनर आणि ट्रॅव्हल्स चालक यांचा जागीच मृत्यू झाला. गरोदरपणामुळे अंजलीला पटकन उठता आले नाही आणि सर्व काही संपले. इतक्यात नियतीने आपला डाव साधला आणि आयशर ट्रक ट्रॅव्हल्स चालकाला चिरडत महिलेच्या पायावरुन जात दुभाजकावरील पोलवर धडकला. यात ट्रॅव्हलचा चालक, आयशरचा चालक आणि क्लिनर जागीच ठार झाले. तर जखमी महिलेला तात्काळ आधी मलकापूर आणि नंतर बुलढाणा रेफर करण्यात आले. मात्र बुलढाणा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
या दुर्देवी घटनेतील अंजली जाधव ही विवाहिता दीड वर्षाचा मुलगा आणि पतीसह वाशिम जिल्ह्यात आपल्या सासरी राहत होती. परंतु, तिचे पतीशी भांडण झाले होते. यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून ती आपल्या आई-वडिलांसोबत सूरत येथे राहत होती. तेथे मोलमजुरीचे काम करत होती. अंजलीला आता नववा महिना लागल्याने तिचे आई-वडिल तिला घेऊन त्यांच्या मूळगावी बडनेरा येथे प्रसुतीसाठी घेऊन चालले होते. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक आणि अंजलीचा दीड वर्षाचा मुलगाही होता. परंतु, या अपघातात पोटातील बाळासह अंजलीचाही दुर्देवी मृत्यू झाला आहे.
महिंद्रा ट्रॅव्हल्सची बस सूरतहून 50 प्रवाशांना घेऊन नागपुरच्या दिशेने रवाना झाली. मात्र बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर शहरातील बायपास रोडवर ट्रॅव्हल्सचे टायर पंक्चर झाले. चालकाचे बस रस्त्याच्या कडेला उभी केली आणि टायरचे पंक्चर काढू लागला. यावेळी बसमधील सर्व प्रवाशीही खाली उतरले आणि रस्त्याच्या कडेला गप्पा मारत बसले होते. इतक्यात भरधाव आयशर ट्रॅव्हलच्या दिशेने येताना सर्वांनी पाहिला. यानंतर सर्व प्रवासी उठून साईडला पळाले. मात्र महिला 9 महिन्यांची गरोदर असल्याने तिला पटकन उठता आले नाही. इतक्यात नियतीने आपला डाव साधला आणि आयशर ट्रॅव्हल चालकाला चिरडत महिलेच्या पायावरुन जात दुभाजकावरील पोलवर धडकले. यात ट्रॅव्हलचा चालक, आयशरचा चालक आणि क्लिनर जागीच ठार झाले. तर जखमी महिलेला तात्काळ आधी मलकापूर आणि नंतर बुलढाणा रेफर करण्यात आले. मात्र बुलढाणा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.