बुलढाणा (बाळू वानखेडे) – राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागातील गट-बमधील बाल विकास प्रकल्प अधिकार्यांना गट-अ संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये मेहकरचे बालविकास प्रकल्प अधिकारी नवनाथ ग. घनतोड़े यांना बालविकास प्रकल्प अधिकारी (ना.) अमरावती शहर पश्चिम या पदावर तर अंबड़ जि.जालना येथील बालविकास प्रकल्प अधिकारी अ. ज्ञा. दिघुळे यांना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बुलढाणा या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली आहे.
राज्य शासनाने महिला व बाल विकास विभागातील गट-ब मधील बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रा.) यांना गट-अ संवर्गात पदोन्नती दिली असून, याबाबतचा आदेश अवर सचिव रा. ता. भालवणे यांनी २३ जूनरोजी जारी केला आहे. यामध्ये मुरबाड़ जि.ठाणे येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती ज्योती शि. लंगुटे यांची बालविकास प्रकल्प अधिकारी (ना.) सातारा पूर्व, कंधार जि.नांदेड येथील बालविकास प्रकल्प अधिकारी वि. ब. चव्हाण यांची बाल विकास प्रकल्प अधिकारी (ना.) हिंगोली, घाटंजी जि.यवतमाळचे बालविकास प्रकल्प अधिकारी न. दा. वामन यांची बालविकास प्रकल्प अधिकारी (ना.) जालना, अकोले जि.अहमदनगर येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी ह.म.हाके यांची बालविकास प्रकल्प अधिकारी (ना.) शिवाजी नगर मुंबई, पंढरपूर जि.सोलापूर येथील बालविकास प्रकल्प अधिकारी अ. रा. सरड़े यांची बालविकास प्रकल्प अधिकारी (ना.) सोलापूर पूर्व, शिरूर जि. बीड़ येथील बालविकास प्रकल्प अधिकारी म. श. जायभाये यांची बालविकास प्रकल्प अधिकारी (ना.) अहमदनगर शहर, जुन्नर जि.पुणे येथील बालविकास प्रकल्प अधिकारी नि.अ.कुचिक यांची जिल्हा कार्यक्रम अधिकारी जि.प.रायगड, आरमोरी जि. गड़चिरोली येथील बालविकास प्रकल्प अधिकारी कि. प्र. कटरे यांची बालविकास प्रकल्प अधिकारी (ना.) वर्धा, तर तलासरी जि.पालघर येथील बालविकास प्रकल्प अधिकारी ग. भा. मांटे यांचीही बालविकास प्रकल्प अधिकारी (ना.) वसई विरार पश्चिम या पदावर पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे. याशिवाय, गटविकास अधिकारी एन.जी.मंड़लीक यांची जिल्हा कार्यक्रम अधिकारी जि.प.रायगड या पदावर केलेली प्रतिनियुक्ती संपुष्टात आणण्यात आल्याचेही सदर आदेशात नमूद असून, पदोन्नती झालेल्या अधिकार्यांना नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ रूजू होण्याचेही सदर आदेशात नमूद आहे.