बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – बेघर, बेसहारा, मनोरुग्ण यांच्या पुनर्वसनासाठी दिव्य सेवा प्रकल्प करत असलेले कार्य कौतुकास्पद असून, त्याची प्रेरणा समाजातील घटकांनी घेणे अपेक्षित असल्याचे मत मनसे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी व्यक्त केले. सामाजिक उपक्रमांनी माझा वाढदिवस साजरा करावा, या राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, अमोल रिंढे पाटील यांनी ठाकरे यांचा वाढदिवस १४ जून रोजी दिव्य सेवाप्रकल्पात अन्नदानाचा कार्यक्रम घेऊन साजरा केला. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलतांना रिंढे म्हणाले की, निराधार, बेसहरा, मनोरुग्ण यांचे अश्रू पुसून त्यांच्या दुःखात सहभागी होता आले. प्रकल्प संचालक अशोक काकडे करत असलेले सामाजिक कार्य विशेष लक्ष वेधून घेत असल्याचे सांगितले. याप्रसंगी अशोक काकडे, आशिष गायके, अनिल वाघमारे, विकास शेळके, गणेश इंगळे, दत्तात्रय जुंबड, कडुबा शिरसाठ, स्वप्नील रिंढे, संकेत पाटील, नितीन पाटील, गणेश पाटील ,सूरज पाटील, ऋषिकेश रिंढे, अजय पवार, गणेश पाटील, यासह प्रकल्पातील बांधवांची उपस्थिती होती.