BULDHANAHead linesMEHAKARVidharbha

दिनेश गिते मेहकर, रामेश्वर पुरी खामगावचे नवे एसडीओ; सिंदखेडराजाचे एसडीओ भूषण अहिरेंची जळगाव जिल्ह्यात बदली

बुलढाणा (बाळू वानखेडे) – राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकार्‍यांच्या १२ जूनरोजी बदल्या केल्या आहेत. यामध्ये मेहकरच्या उपविभागीय अधिकारी (एसड़ीओ) पदी दिनेश गिते यांची नियुक्ती करण्यात आली असून, बाळापूर (जि.अकोला)चे एसड़ीओ रामेश्वर पुरी यांची खामगावचे उपविभागीय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शासनाच्या महसूल व वन विभागाने १२ जूनरोजी उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकार्‍यांच्या प्रशासकीय कारणास्तव विनंतीवरून बदल्या केल्या आहेत. यामध्ये मेहकरच्या उपविभागीय अधिकारी रिक्तपदी बुलढाणा येथील निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांना पदस्थापना देण्यात आली आहे, तर खामगाव उपविभागीय अधिकारी रिक्तपदावर बाळापूर जि. अकोला येथील रामेश्वर पुरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे यवतमाळ येथील उपजिल्हा निवड़णूक अधिकारी श्रीमती स्नेहल कानीचे यांची उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. सहा सांगली या रिक्तपदावर नियुक्ति करण्यात आली आहे.

बुलढाणा येथील उपजिल्हाधिकारी महसूल अभिजीत नाईक यांना उपविभागीय अधिकारी कोरेगाव जि.सातारा येथे पदस्थापना देण्यात आली आहे. अमरावती येथील जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुभाष दळवी यांची उपविभागीय अधिकारी शहादा जि.नंदुरबार तर सिंदखेड़राजा जि.बुलढाणा येथील उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांची बदली उपविभागीय अधिकारी पाचोरा जि.जळगाव येथे करण्यात आली आहे. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले मुकेश चव्हाण यांची उपविभागीय अधिकारी अलीबाग जि.रायगड येथे नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश ड़ॉ.माधव वीर सहसचिव यांनी जारी केला आहे.


राजेंद्र जाधव बुलढाण्याचे एसडीओ

महिनाभरापेक्षा अधिक कालावधीपासून प्रभारी असलेले बुलढाण्याचे एसडीओ पद राजेंद्र जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.  जाधव हे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मुंबई या ठिकाणी महाव्यवस्थापक पदावर कार्यरत होते.  ते  मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील असून, त्यांना हाेम डिस्ट्रिक्ट मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!