AalandiBreaking newsHead linesPachhim Maharashtra

आजोळघरी माऊलींच्या पालखी सोहळ्याचा पाहुणचार!

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : लाखो वैष्णव भक्तांचे मांदियाळीने भगव्या पताका उंचावत आळंदीहून उद्योगनगरी मार्गे पुण्यनगरी मुक्कामास माऊलींचा पालखी सोहळा हरिनाम गजरात निघाला. अलंकापुरीतील जुन्या श्रीपादबुवा गांधी वाड्यातील जागेत नव्याने विकसित दर्शनबारी मंडपात आजोळघरी ( गांधीवाडा ) श्रीचे पालखी सोहळ्याने पहिल्या मुक्कामात गांधी परिवारासह आळंदीकरांचा पाहुणचार घेतला. श्रींचे वैभवी पालखी सोहळ्याने सोमवारी भल्या पहाटे ( दि.१२ ) दोन दिवसांचे मुक्कामासाठी पुण्यनगरी मार्गे पंढरी जाण्यास आळंदीकरांचा निरोप घेतला. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुण्यनगरीत दोन दिवस विसावणार असून बुधवारी ( दि. १४ ) दिवेघाट मार्गे सासवड ला निघणार आहे.

आळंदीतील एक दिवसाचा मुक्कामा नंतर श्रीचे सोहळ्यास निरोप देण्यासाठी आळंदीकर धाकट्या पादुका, थोरल्या पादुका मंदिरा पर्यंत लहानग्यासह आले होते. सोहळ्यात सुमारे बत्तीस दिवसांचा विरह सहन करावा लागणार असल्याने माऊलींना निरोप देताना अनेकांचे नेत्रांच्या कडा पान्हावल्या तर अनेकांचे हृदय भरून आले होते. गेल्या चार दिवसांपासून आळंदीत लाखो वैष्णवांचा हरिनामाचा गजर चालू होता.आज पहाटे भाविकांना आजोळघरातील माऊलींच्या पादुकांचे दर्शन पालखीसह रथातून झाले. आजोळ घरी गांधी कुटुंबीयांच्या वतीने रुद्राभिषेक आणि पादुका पूजन करण्यात आले. त्यांच्या वतीने नैवेद्य दाखविण्यात आला. देवस्थानच्या वतीने पहाट पूजा आणि आरती झाली. यानंतर उर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या वतीने माऊलींना प्रथा परंपरेने नैवेद्य वाढविण्यात आला. दरम्यान आळंदीकर माऊलींची पालखी खांद्यावर उचलण्यासाठी पहाटे सज्ज झाले होते. सहाच्या सुमारास श्रीची पालखी आजोळघरातून आळंदीकर खांदेकरी यांनी खांद्यावर घेत बाहेर आणली.

त्यानंतर माउली-माउली नामाच्या गजरात व “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’च्या नामघोषात पालखी नगर पालिका चौकात खांदेकरी ग्रामस्थांनी नाचवित आणली. या ठिकाणी स्व. माजी नगराध्यक्ष नानासाहेब गरुड यांचे सुदीप गरुड आणि गरुड परिवाराने लक्षवेधी पुष्प सजावटीने सजलेल्या वैभवी चांदीचे रथात आळंदीकरांनी पालखी फुलांनी सजविलेल्या चांदीच्या रथात ठेवली. आळंदी पालिकेच्या वतीने देवस्थान समिती, मालक, चोपदार, दिंडीकरी या मानकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी मुख्याधिकारी कैलास केंद्रे, आळंदी प्रशासक वैशाली वाघमारे, नायब तहसीलदार मदन जोगदंड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, पोलीस निरीक्षक रमेश पाटील, वाहतूक पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांचे सह नगरपरिषद, महसूल अधिकारी, आळंदी नगरपरिषदेचे माजी पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, आळंदीतील प्रदक्षिणा मार्ग, पालिका चौक, देहू फाटा, चोविसावाडी, वडमुखवाडी या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी माउलींच्या पालखी रथाचे तसेच पालखीतील पादुकांचे दर्शनासाठी तसेच सोहळ्यास निरोप देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पंचक्रोशीतील महिला, पुरुष, लहान मुले माउलींच्या रथासोबत चालत होते. दरम्यान, विविध मंडळे, संघटनांच्या वतीने सोहळ्यातील वारकऱ्यांना चहा, पोहे, गुडदाणी, पाणी वाटप उत्साहात करण्यात आले.

आळंदीत भाविकांना बुंदी प्रसाद वाटप ; आरोग्य सेवा

माउलीचे वैभवी पालखी सोहळ्यास भावपूर्ण निरोप देत आळंदीत येथील समाजरत्न नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांचे वतीने हजारो वारकरी भाविकांना बुंदीचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी माजी नगरसेवक ज्ञानेश्वर रायकर, संयोजक सामाजिक कार्यकर्ते मनोहर दिवाणे, सुवर्णा ठाकरे, पंढरीनाथ जरे, मंडूबाबा पालवे, माजी नगराध्यक्षा शारदा वडगावकर, उद्योजक पोपटशेठ वडगावकर, अशोक ढोरजे, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, राहुल काळे, मंगला शेवकरी, मान्यवर उपस्थित होते. संयोजक सामाजिक कार्यकर्ते मनोहर दिवाणे यांनी घेतले. अलंकापुरी प्रतिष्ठानचे वतीने अध्यक्ष किरण येळवंडे यांचे उपस्थितीत भाविकांना प्रसाद वाटप तसेच श्रींचे सोहळ्यात रुग्णवाहिका आणि आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठानच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांना भाकरी चे वाटप करण्यात आले झुणका भाकरी सह बंदी प्रसाद भावी पारकर यांनी घेण्यास मोठी गर्दी केली या उपक्रमाचे आयोजन राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष अनिता झुजम यांनी केले. यावेळी शैला तापकीर, संतोषी पांडे, ताई ननावरे, सपना घायाळ, अनिता शिंदे आदी उपस्थित होते.

व्यसन मुक्त जीवन जगा – नानजीभाई ठक्कर

यावेळी बोलताना नानजीभाई म्हणाले, प्रत्येकाने व्यसन मुक्त जीवन जगले पाहिजे. यातून जीवनात निश्चित यश मिळेल. भावी पिढी सक्षम करण्यासाठी आरोग्य दायी जीवनात व्यसन मुक्त राहणे गरजेचे आहे. मुलगा, मुलगी यांच्यात भेदभाव न करता स्त्री भ्रूण हत्या करू नका असा संदेश यावेळी त्यांनी सोहळ्यात दिला. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

भक्तिमय अलंकापुरीत स्वच्छता अभियानाचा प्रारंभ :  मुख्याधिकारी केंद्रे
आळंदीतून श्रींचे पालखी सोहळ्यास निरोप देत आता आळंदीत स्वच्छ आळंदी, सुंदर आळंदी, निर्मल आळंदी अंतर्गत आषाढी वारी प्रस्थान नंतर प्रभावी पणे शहर स्वच्छ करण्यासाठी स्वच्छता अभियान आळंदी नगरपरिषदेने सुरु केले आहे. शहरातील सर्व ठिकाणचा कचरा साफ सफाई करून नागरिक-
भाविकांचे आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे. स्वच्छतेस महत्त्व देत परिसर निर्मल करण्याचे सूचना विभाग प्रमुख, कामगार आणि संबंधित यंत्रणा यांना दिल्या असल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले.

वारीच्या परंपरा कायम ठेवण्यास प्राधान्य :  मालक बाळासाहेब आरफळकर

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात श्री गुरु हैबतबाबा यानी ज्या परंपरा घालुन दिल्या आहेत त्या सर्व परंपरा जोपासल्या जातील असे पालखी सोहळ्याचे मालक व हैबतबाबांचे वंशज बाळासाहेब आरफळकर पवार यानी सांगितले . संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आळंदीतून श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाण्यास मंदिरातून प्रस्थान झाले. या प्रस्थान सोहळ्यात पुण्यनगरीत प्रवेशण्यापूर्वी पालखी सोहळ्याची माहिती दिली. मालक आरफळकर म्हणाले , संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वैभवी पालखी सोहळ्याला मोठी परंपरा आहे. पालखी सोहळ्यात परंपरेने ज्याना मान आहेत ते कोठेही डावलले जाणार नाहीत . पालखी सोहळ्यात सर्वाना विश्वासात घेउनच निर्णय घेतले जातात .मुक्कामाचे ठिकाणी गावकऱ्यांच्या भावना जपल्या जातील . ऱिंगण सोहळ्या बाबत बोलताना आरफळकर म्हणाले , पालखी सोहळ्यात तीन उभी व चार गोल रिंगणे होतात . अलीकडच्या काळात या रिंगणाना मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते.सोहळा हा परंपरे प्रमाणेच चालला पाहिजे . ज्यानी सोहळ्यासाठी पूर्वीच्या काळी मदत केली आणि सोहळ्याचे वैभव वाढविले. तो वारसा पुढे बरोबर घेऊन यापुढील वाटचाल कायम राहील असे ते म्हणाले .

आळंदी सोहळ्यात पोलिस मित्रांचे कौतुक : आमदार रोहित पवार

आळंदीतील पोलिस मित्र युवा महासंघ महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने पदाधिकारी, सदस्य यांनी गेल्या चार दिवसांपासून आषाढी वारीत बंदोबस्तासाठी सेवा व मदत कार्य करीत पोलीस प्रशासनास सहकार्य केले. या निमित्त महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी ज्योती पाटील, प्रदेश अध्यक्ष प्रवीण बोबडे यांनी सर्व सेवकांचे आभार मानले. पोलिस मित्र परीवाराने केलेल्या सेवा कार्याचे कौतुक आमदार रोहितदादा पवार यांनी आळंदी मंदिरात पोलीस मित्रा समवेत संवाद साधून कौतुक केले. त्यांनी जेव्हा पोलीस मित्रांची भेट घेऊन संवाद साधला त्यावेळी पोलीस मित्र महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेची माहिती त्यांना देण्यात आली. यावेळी पवार यांनी सेवेच्या कार्याचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!