दप्तर लावण्यातच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचार्यांचे गेले दोन दिवस!
सोलापूर (संदीप येरवडे) – सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्यालय यांचे कार्यालय दोन दिवस झाले स्थलांतर झाले आहे. परंतु या कार्यालयामध्ये सध्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे पाण्याची सोय करण्याची मागणी कर्मचार्यास नागरिकांकडून केली जात आहे. तर कर्मचार्यांचे दोन दिवस दप्तर लावण्यातच गेले आहे.
सोलापूरचे जुने जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषदेला लागून होते. हे कार्यालय अपुरे पडत असल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले नवीन जिल्हाधिकारी कार्यालय आता सात रस्ता या ठिकाणी पूर्ण झाले आहे. नवीन जिल्हाधिकारी कार्यालय पूर्ण झाल्यामुळे या ठिकाणी गेल्या दोन दिवसापासून कार्यालय स्थलांतर झाले आहे. दोन दिवसापासून महसूलचे कर्मचारी नव्या कार्यालयामध्ये दप्तर लावायचे काम करीत आहेत. जुन्या कार्यालयातील सर्व दप्तर आणि इतर साहित्य लावण्यासाठी कर्मचार्यांना दिवस पुरत नाही. विशेष म्हणजे, सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे पाण्याची मागणी केली जात आहे. परंतु नवीन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाणी नसल्यामुळे कर्मचार्यास व आलेल्या नागरिकांना देखील अडचणी निर्माण होत आहेत.
गेल्या दोन दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालय नवीन इमारतीमध्ये गेल्यामुळे नवीन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नेमके कोणता विभाग कुठे आहे याची सध्या माहिती नागरिकांना होत नाही. त्यामुळे नागरिकांना कार्यालय कुठे आहे याबाबत विचारात जावे लागत आहे. तर काही नागरिक जुन्या कार्यालयाकडेच हेलपाटे मारून माघारी जात आहेत.